मुंबई बातम्या

मुंबई इंडियन्सला आयपीएलच्या आधी बसला मोठा सेटबॅक, १७.५ कोटींना घेतलेला खेळाडू रुग्णालयात – Maharashtra Times

मेलबर्न: मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. इंडियन प्रीमियर लीग २०२३ च्या मिनी लिलावात चमकणारा कॅमेरून ग्रीन याच्याबाबत मोठी अपडेट आली आहे. लिलावात १७.५ कोटींच्या मोठ्या किमतीत विकला गेलेला ह्या गोलंदाजाला आता हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले आहे. बॉक्सिंग डे कसोटीच्या दुसऱ्या दिवशी कॅमेरून ग्रीनला दुखापत झाली. एनरिक नॉर्खियाचा एका वेगवान चेंडू त्याच्या ग्लोव्हजवर आदळला आणि ग्रीन वेदनेने कळवळला. ग्रीनने हातमोजे काढले तेव्हा त्याच्या बोटातून रक्त येत होते.

सध्या मेलबर्नमध्ये बॉक्सिंग डे कसोटी सामने सुरु आहेत. यामध्ये दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यात कॅमेरून ग्रीन हा फलंदाजी करत होता. त्याच्या हाताला लागलेला चेंडू इतका जबर होता की बोटातून रक्त येऊ लागले. ग्रीनला तत्काळ मैदानाबाहेर नेण्यात आले आणि या खेळाडूला स्कॅनसाठी पाठवले गेले.

वाचा: वॉर्नरची अद्वितीय कामगिरी! १०० व्या कसोटीत द्विशतक; इतिहास घडवताच मैदानाबाहेर गेला, पाहा VIDEO

ऑस्ट्रेलियन मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, कॅमेरून ग्रीनला मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवरून थेट हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, जेथे त्याचे दुखापत झालेले बोट स्कॅन केले जाईल. या अष्टपैलू खेळाडूची दुखापत खूपच गंभीर असल्याने ग्रीन या कसोटी सामन्यात पुढे खेळू शकणार नाही, अशी शक्यता वाटतं आहे.

हेही वाचा: ‘काहीतरी कर भाऊ; पप्पी वगैरे घे..’; मॅच झाल्यानंतर पुजाराला कोणी दिला अजब सल्ला,

एक्स्ट्रा बाउन्स असलेला चेंडू हातावर आदळला

८५ व्या षटकात कॅमेरून ग्रीनला दुखापत झाली. जगातील सर्वात वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेला एनरिक नॉर्खिया गोलंदाजी करत होता. नॉर्खियाचा पाचवा चेंडू हा एक शॉर्ट बॉल होता, जो थेट ग्रीनच्या जवळ येऊन पडला. ग्रीनने बॉल हलक्या हातांनी खेळण्याचा प्रयत्न केला पण अचानक तो एक्सट्रा बाऊन्स झाला. त्यामुळे चेंडूचा संपर्क बॅटऐवजी थेट ग्लोव्हजशी झाला. यानंतर ग्रीनने हातमोजे काढले, तेव्हा त्याच्या बोटातून रक्त येत होते. ग्रीनला दुखापत करणाऱ्या चेंडूचा वेग १४४.६ किमी प्रतितास होता.

वाचा: मी तुम्हाला सोडणार नाही, आंतरराष्ट्रीय पातळीवर जाणार; हकालपट्टीनंतर रमीझ राजांची

ग्रीनची उत्तम कामगिरी

६ धावांच्या वैयक्तिक स्कोअरवर ग्रीनने रिटायर्ड हर्ट झाला, परंतु या खेळाडूने पहिल्या डावात त्याने अप्रतिम खेळ दाखवला. ग्रीनने पहिल्या डावात २७ धावांत ५ बळी घेतले. ग्रीनसाठी शेवटचा आठवडा आश्चर्यकारक होता. मुंबई इंडियन्सने १७.५ कोटी इतक्या मोठ्या किमतीत या खेळाडूला संघात घेतले. ग्रीन हा आयपीएलच्या इतिहासातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ग्रीनने प्रथमच आयपीएल खेळण्यासाठी आपले नाव नोंदवले होते.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMivgFodHRwczovL21haGFyYXNodHJhdGltZXMuY29tL3Nwb3J0cy9jcmlja2V0L2NyaWNrZXQtbmV3cy9jYW1lcm9uLWdyZWVuLWdvdC1pbmp1cmVkLWFuZC1ydXNoZWQtdG8taG9zcGl0YWwtaW4tc2EtdnMtYXVzLWJveGluZy1kYXktdGVzdC1tYXRjaC1pbi1tZWxib3VybmUtd2F0Y2gtdmlkZW8vYXJ0aWNsZXNob3cvOTY1Mzk3NjQuY21z0gHCAWh0dHBzOi8vbWFoYXJhc2h0cmF0aW1lcy5jb20vc3BvcnRzL2NyaWNrZXQvY3JpY2tldC1uZXdzL2NhbWVyb24tZ3JlZW4tZ290LWluanVyZWQtYW5kLXJ1c2hlZC10by1ob3NwaXRhbC1pbi1zYS12cy1hdXMtYm94aW5nLWRheS10ZXN0LW1hdGNoLWluLW1lbGJvdXJuZS13YXRjaC12aWRlby9hbXBfYXJ0aWNsZXNob3cvOTY1Mzk3NjQuY21z?oc=5