मुंबई बातम्या

हिवाळ्यात बद्धकोष्टतेसोबत अनेक त्रास होतील दूर, फक्त रोज यावेळी खा बडीशेप – News18 लोकमत

मुंबई, 26 डिसेंबर : भारतीय खाद्यसंस्कृतीत मसाल्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. आपल्या स्वयंपाकघरात अनेक प्रकारचे मसाले असतात. यातीलच एक मसाल्याचा सौम्य प्रकार म्हणजे बडीशेप. विविध प्रकारचे खाद्यपदार्थ बनवण्यासाठी बडीशेपचा वापर केला जातो. बडीशेपमुळे खाद्यपदार्थ चवदार बनतात. याशिवाय माऊथ फ्रेशनर म्हणूनही बडीशेप वापर केला जातो. यात असलेले अनेक पोषक घटक शरीरासाठी लाभदायक असतात. बडीशेपमध्ये कॅल्शियम आणि आयर्नसारखे पोषक घटक असतात. रोज सकाळी रिकाम्या पोटी बडीशेप खाल्ल्यास आरोग्याला अनेक फायदे होतात.

बडीशेपमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, फायबर आणि अँटी-इंफ्लेमेटरी असे अनेक गुणधर्म आढळतात. यामुळे डोळ्यांचा कमकुवतपणा दूर होतो आणि डोळ्यांना आराम मिळतो. याशिवाय बडीशेप खाल्ल्याने पोटाच्या समस्येपासून देखील आराम मिळते. यात असलेल्या अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांमुळे त्वचेच्या अनेक समस्यां दूर करण्यास मदत होते.जाणून घेऊया रोज सकाळी बडीशेप खाण्याचे फायदे.

Stale Food Side Effect : शिळे अन्न आपल्याला खरंच आळशी बनवते का? वाचा सत्य

रोज सकाळी बडीशेप खाण्याचे फायदे

बद्धकोष्ठतेपासून आराम : बडीशेपमध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते. रोज सकाळी बडीशेप खाल्याने पचनक्रिया चांगली राहते. तसेच पचनाशी संबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळतो. सकाळी बडीशेप खाल्ल्याने बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून देखील आराम मिळतो.

रोगप्रतिकारशक्ती वाढते : रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी देखील बडीशेपमध्ये अतिशय प्रभावी आहे. यात असलेल्या व्हिटॅमिन सी मुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. सकाळी रिकाम्या पोटी बडीशेपचे खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.

हाडांसाठी फायदेशीर : बडीशेपमध्ये कॅल्शियम देखील आढळते. त्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी बडीशेप खाल्ल्याने हाडे मजबूत राहण्यास मदत होते. बडीशेप ऑस्टियोपोरोसिस सारख्या आजारांना दूर ठेवण्यासाठी देखील प्रभावी मानली जाते.

Health Tips : वयाच्या 18 वर्षांनंतरही वाढू शकते तुमची उंची, फक्त करा हे उपाय

रक्ताची कमतरता दूर होते : बडीशेपमध्ये भरपूर प्रमाणात लोह आढळते. बडीशेप खाल्ल्याने शरीरात रक्ताची कमतरता दूर होते. अॅनिमियाच्या समस्येपासून दूर ठेवण्यासाठी बडीशेप अतिशय फायदेशीर ठरते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMicWh0dHBzOi8vbG9rbWF0Lm5ld3MxOC5jb20vbGlmZXN0eWxlL2VhdC1mZW5uZWwtaW4td2ludGVyLW1vcm5pbmctdG8tZ2V0LXJlbGllZi1mcm9tLWNvbnN0aXBhdGlvbi1taHBqLTgwNTQxNC5odG1s0gF1aHR0cHM6Ly9sb2ttYXQubmV3czE4LmNvbS9hbXAvbGlmZXN0eWxlL2VhdC1mZW5uZWwtaW4td2ludGVyLW1vcm5pbmctdG8tZ2V0LXJlbGllZi1mcm9tLWNvbnN0aXBhdGlvbi1taHBqLTgwNTQxNC5odG1s?oc=5