मुंबई बातम्या

मुंबई महामार्गावर दरड कोसळली; नर्‍हे परिसरातील घटना – Pudhari

धायरी; पुढारी वृत्तसेवा : मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर नर्‍हे परिसरात स्वामी नारायण मंदिरासमोर शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास दरड कोसळली. यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ खोळंबली होती. दरड कोसळली त्या वेळी तेथून कोणतेही वाहन जात नसल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.

या घटनेची माहिती मिळताच सिंहगड वाहतूक शाखेचे पोलिस हवालदार अशोक कदम व दत्ता पठाडे हे ताबडतोब घटनास्थळी पोहोचले. त्यांनी त्वरित जेसीबी बोलावून महामार्गावर कोसळलेल्या दरडीचा राडारोडा दूर केला. त्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. दरम्यान, दरड कोसळल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक खोळंबल्याने वाहनचालक व प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMiUmh0dHBzOi8vcHVkaGFyaS5uZXdzL21haGFyYXNodHJhL3B1bmUvNDE1OTg3L2EtY3JhY2stZmVsbC1vbi10aGUtbXVtYmFpLWhpZ2h3YXkvYXLSAVJodHRwczovL3B1ZGhhcmkubmV3cy9tYWhhcmFzaHRyYS9wdW5lLzQxNTk4Ny9hLWNyYWNrLWZlbGwtb24tdGhlLW11bWJhaS1oaWdod2F5L2Fy?oc=5