मुंबई बातम्या

मुंबई पोलीस म्हणतात, आमच्याकडे पुरावे नाहीत! भाजप नेते मोहित कंबोज यांना क्लीन चिट – Maharashtra Times

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे नेते मोहित कंबोज यांना क्लीन चीट मिळाली आहे. संजय पांडे मुंबईचे पोलीस आयुक्त असताना कंबोज यांच्यावर आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. यानंतर पांडे आणि कंबोज यांच्यातील वाद बराच चर्चेत आला. यानंतर पांडे यांना अटकदेखील झाली होती.

आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल झाल्यानंतर मोहित कंबोज यांनी थेट पांडे यांना आव्हान दिलं. कंबोज यांनी पांडेंचे आर्थिक घोटाळे बाहेर काढले होते. यानंतर आता कथित बॅंक घोटाळा प्रकरणात मोहित कंबोज यांना आर्थिक गुन्हे शाखेनं क्लीन चीट दिली आहे. आर्म्स ॲक्ट अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यांमधूनही कंबोज यांची सुटका झाली आहे. मुंबई पोलिसांनी दोन्ही प्रकरणात कंबोज यांना क्लिन चीट दिली आहे. आमच्याकडे या प्रकरणांमध्ये पुरावे नाहीत. त्यामुळे कंबोज यांना क्लीन चिट देत असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
नवनीत राणांच्या अडचणीत वाढ! वॉरंटची अंमलबजावणी करा, न्यायालयाचे पोलिसांना आदेश
नेमकं प्रकरण काय?
भाजप नेते मोहित कंबोज यांच्याविरोधात आर्थिक गुन्हे शाखेनं जूनमध्ये गुन्हा दाखल केला होता. कंबोज यांनी इंडियन ओव्हरसीज बँकेकडून २०११ ते २०१५ दरम्यान ५२ कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. कर्जाची रक्कम ज्या कारणासाठी घेतली होती, त्यासाठी वापरली गेली नसल्याचा आरोप त्यांच्यावर होता. आर्थिक गुन्हे शाखा अर्थात EOW ने मुंबईत मोहित कंबोज यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यांच्या कंपनीने तब्बल ५२ कोटी रुपयांचं कर्ज बुजवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. या कारवाईची मोठी चर्चा राजकीय वर्तुळात झाली होती.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMingFodHRwczovL21haGFyYXNodHJhdGltZXMuY29tL21haGFyYXNodHJhL211bWJhaS1uZXdzL2JqcC1sZWFkZXItbW9oaXQta2FtYm9qLWdldHMtY2xlYW4tY2hpdC1mcm9tLW11bWJhaS1wb2xpY2UtZWNvbm9taWMtb2ZmZW5jZS13aW5nL2FydGljbGVzaG93Lzk2NDQzMzQwLmNtc9IBogFodHRwczovL21haGFyYXNodHJhdGltZXMuY29tL21haGFyYXNodHJhL211bWJhaS1uZXdzL2JqcC1sZWFkZXItbW9oaXQta2FtYm9qLWdldHMtY2xlYW4tY2hpdC1mcm9tLW11bWJhaS1wb2xpY2UtZWNvbm9taWMtb2ZmZW5jZS13aW5nL2FtcF9hcnRpY2xlc2hvdy85NjQ0MzM0MC5jbXM?oc=5