मुंबई बातम्या

मुंबई -गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा – News18 लोकमत

रत्नागिरी :  मुंबई -गोवा महामार्गावरून वाहतूक करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे.  महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या लांबच लाबं रांगा लागल्या आहेत. सध्या महामार्गाच्या रुंदीकरणाचं काम सुरू आहे. या कामाचा परिणाम हा वाहतुकीवर होत असल्याचं पहायला मिळत आहे. महामार्गाचे काम सुरू असल्याने वाहनांचा वेग मंदावला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. या वाहतूक कोंडीचा प्रवाशांना मोठा फटका बसला आहे.

रस्त्याच्या कामाचा वाहतुकीला फटका  

मुंबई -गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या कामाचा परिणाम हा वाहतुकीवर होत आहे. महामार्गालगतच्या गटाराचे काम सुरू झाल्यानं वाहतूक काहीशी मंदावली आहे. वाहने धीम्या गतीने धावत असल्यानं महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. बहादुर शेख नाका ते डीबीजे कॉलेजपर्यंत अशा वाहनाच्या लांबचं लांब रांगा लागल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMiX2h0dHBzOi8vbG9rbWF0Lm5ld3MxOC5jb20vbWFoYXJhc2h0cmEvbXVtYmFpL3RyYWZmaWMtamFtLW9uLW11bWJhaS1nb2EtaGlnaHdheS1taGRhLTc4ODUyNC5odG1s0gEA?oc=5