मुंबई बातम्या

Mumbai Firecrackers : विनापरवाना फटाके विक्रीवर बंदी, मुंबई पोलिसांनी जारी केले आदेश! – India.com Marathi

Mumbai Firecrackers : कोरोनामुळे (Corona Virus) दोन वर्षांमध्ये कोणतेही सण साजरे करण्यात आले नव्हते. पण यावर्षी सरकारने (Maharashtra Government) कोरोनाचे सर्व निर्बंध हटवल्यामुळे यावर्षी सर्वच सण मोठ्या उत्साहात साजरे केले जात आहे. गणेशोत्वस, नवरात्रोत्सवापाठोपाठ आता दिवाळी देखील दोन दिवसांवर आली आहे. दिवाळी म्हटलं की सगळीकडे दिव्याचा लखलखाट असतो. मोठ्याप्रमाणात फटाके (Firecrackers) फोडत आतषबाजी केली जाते. यंदाची दिवाळी सर्वांसाठी खूपच खास असल्यामुळे सर्वजण जोरदार तयारी करत आहे. मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फटाके आले आहेत. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी फटाके खरेदी करण्यासाठी फटाक्यांच्या दुकानांमध्ये मोठी गर्दी केली आहे. पण आता मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) फटाक्यांच्या विक्रीबाबत आदेश जारी केले आहे. विनापरवाना फटाक्यांच्या विक्रीवर पोलिसांनी बंदी घातली आहे.Also Read – Mumbai News : मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर पारस पोरवाल यांची आत्महत्या, इमारतीच्या 23 व्या मजल्यावरुन मारली उडी!

दिवाळीमध्ये विनापरवाना फटाक्यांची विक्री केली जाते. पण यावेळी मुंबई पोलिसांनी विनापरवाना फटाक्यांची विक्रीवर बंदी घातली आहे. दिवाळीत पोलिसांच्या परवानगीशिवाय मुंबईत फटाके विकता येणार नाहीत. मुंबई पोलिसांनी परवानगीशिवाय फटाके विकण्यासंदर्भात आदेश जारी केले आहेत. विनापरवाना फटाके विकणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे मुंबई पोलिसांनी आपल्या आदेशामध्ये म्हटले आहे. मुंबई पोलिसांनी फटाके विक्रीसंदर्भात दिलेला हा आदेश 16 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबरदरम्यान लागू राहिल. Also Read – Katrina Kaif Vicky Kaushal: प्रोड्यूसरच्या दिवाळी पार्टीत भाव खाऊन गेले कतरिना-विकी, लव्ह बर्ड्सचा रोमँटिक अंदाज चर्चेत!

Also Read – Diwali Safety Tips: फटाके फोडताना हाताला भाजले तर ट्राय करा हे घरगुती उपाय, लवकर मिळेल आराम!

परवाना नसताना देखील अनेक ठिकाणी दुकानदारांकडून फटाक्यांची विक्री केली जाते. अशापद्धतीने फटाक्यांची विक्री केल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्याचसोबत हे फटाके विक्रेते विकत असलेल्या फटाक्यांच्या सुरक्षिततेबाबतही काहीच शाश्वती नसते. यासर्व गोष्टी लक्षात घेता आणि नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घेत मुंबई पोलिसांनी विना परवाना फटाके विक्री करण्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे आदेशानुसार 16 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या दरम्यान विनापरवाना फटाके विकाणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.

Source: https://www.india.com/marathi/maharashtra/mumbai-firecrackers-ban-on-sale-of-firecrackers-without-license-mumbai-police-issued-order-5695978/