मुंबई बातम्या

मुंबई महापालिका अॅक्शन मोडवर,1 ऑक्टोबरपासून दुकानांसाठी ‘हा’ नियम सक्तीचा – TV9 Marathi

महापालिकेने मुंबईतील सर्वच लहान मोठ्या दुकानदारांसाठी हा नियम सक्तीचा करण्यात आला आहे. यापूर्वीच हा नियम काढण्यात आला होता. 30 सप्टेंबरपर्यंत दुकानदारांसाठी पालिकेने मुदत दिली होती.

[embedded content]

मंजिरी धर्माधिकारी |
Sep 24, 2022 | 10:32 AM

मुंबईः आगामी महापालिका निवडणुकांच्या (Municipal corporation) पार्श्वभूमीवर मुंबईत पुन्हा एकदा मराठीचा मुद्दा उचलून धरण्यात आलाय. मुंबई महापालिकेने सर्वच दुकानदारांसाठी एक नियम सक्तीचा केला आहे. सर्वच दुकानांवर मराठी पाट्या (Marathi board) लावण्यात याव्यात, असे आदेश देण्यात आले आहेत. ज्या दुकानदारांनी मराठी पाट्या लावल्या नाहीत, त्यांच्यावर 1 ऑक्टोबरनंतर (October) कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. महापालिकेने मुंबईतील सर्वच लहान मोठ्या दुकानदारांसाठी हा नियम सक्तीचा करण्यात आला आहे. यापूर्वीच हा नियम काढण्यात आला होता. 30 सप्टेंबरपर्यंत दुकानदारांसाठी पालिकेने मुदत दिली होती. आधी शिवसेनेने दुकानांवर मराठी पाट्या असाव्यात, यासाठी आग्रह धरला होता. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हा मुद्दा उचलून धरला होता. मनसेने यासाठी मोठं आंदोलनही केलं होतं.

Source: https://www.tv9marathi.com/politics/marathi-boards-forced-on-shops-in-mumbai-action-will-be-taken-from-october-1-au122-806226.html