मुंबई बातम्या

एका उंदरामुळे मुंबई पोलिसांना सापडलं महिलेचं 10 तोळे सोनं; चित्रपटाच्या कथेप्रमाणेच आहे संपूर्ण घटना – News18 लोकमत

मुंबई 17 जून : जगात कधी काय होईल सांगता येत नाही. कधी कोणाला कचऱ्यात सोनं मिळू शकतं, तर कोणी चुकून महागडं असं सोनंच कचऱ्यात फेकून देतं. मुंबईत (Mumbai Police) असाच एक प्रकार समोर आला आहे. एका महिलेचे आपल्या कष्टाने कमावलेले तब्बल 10 तोळे सोन्याचे दागिने तिच्याच एका चुकीमुळे चक्क कचऱ्यात (Mumbai lost Gold) गेले. मात्र खरी आश्चर्यचकित करणारी गोष्ट तर पुढे आहे. ही महिला जेव्हा पोलिसांकडे पोहोचली, तेव्हा पोलिसांनी कचरापेटीतील उंदराचा माग घेत तिला तिचे दागिने परत मिळवून दिले.
13 जून 22ला ही घटना घडली. मुंबईतील मालाड पूर्व भागातील दिंडोशी येथील एका महिलेबाबत हा किस्सा घडला. ही महिला घरकाम करते. या महिलेने आपल्या पगारातून पैसे वाचवून सुमारे 10 तोळे सोन्याचे दागिने (Gold jewellery) तयार केले होते. मात्र आपल्या निष्काळजीपणामुळे तिने ते सोनं गमावलं. आपल्या चुकीची जाणीव झाल्यानंतर तिने पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनीही तपास करत कचरापेटीतील एका उंदराचा माग घेत (Mumbai police seized gold from Rat) हे सोनं परत मिळवलं.

हाताची नस कापून मुंबई उच्च न्यायालयातच आत्महत्येचा प्रयत्न; माजी सैनिकाचं धक्कादायक पाऊल

कसे हरवले दागिने?
या महिलेनं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ती दागिने घेऊन बँकेत जमा करण्यासाठी जात होती. रस्त्यात तिला दोन मुलं दिसली. रस्त्यावर राहणाऱ्या या मुलांना खूप भूक लागली होती. या महिलेकडे पिशवीत काही वडापाव होते. तिने ती पिशवी या मुलांना दिली आणि पुढे निघून गेली. पुढे गेल्यानंतर तिने पर्समध्ये पाहिलं, तर त्यात दागिने नव्हते. तेव्हा तिच्या लक्षात आलं, की वडापावसकट तिने या मुलांना दागिन्यांची पिशवी दिली आहे. ती लगेच त्या ठिकाणी परत गेली, मात्र ही मुलं तोपर्यंत निघून गेली होती.
पोलिसांनी असा लावला शोध
यानंतर महिलेने पोलिसांकडे जात सर्व प्रकार सांगितला. पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्हींच्या मदतीने या मुलांची ओळख पटवली. या मुलांना शोधत पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचले. मुलांनी सांगितलं, की त्यांना वडापाव खायचा नव्हता, त्यामुळे त्यांनी ती पिशवी न उघडताच कचऱ्यात फेकून दिली. यानंतर पोलिसांनी कचऱ्याच्या कंटेनरची तपासणी केली, मात्र सोनं मिळालं नाही.

नात्यातील भयंकर रूप : एकाने आईला क्रूरपणे मारलं तर मुंबईत आईने स्वत:च्या लाडक्या 19 वर्षीय लेकीला संपवलं
पोलिसांनी त्या भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं फुटेज (Mumbai police found gold with help of Rat) तपासल्यानंतर लक्षात आलं, की एका उंदराने पाव (Rat took gold with bread) खाण्यासाठी ही पिशवी ओढत खाली गटारात नेली होती. यानंतर गटाराची तपासणी केल्यानंतर पोलिसांना ती दागिन्यांची पिशवी मिळाली, आणि त्यांनी महिलेला ती परत केली. यानंतर महिलेने पोलिसांचे आभार मानले.
एखाद्या चित्रपटातील वाटावी अशा या घटनेचा सिनेमाप्रमाणेच हॅप्पी एन्ड झाल्यामुळे महिला आणि पोलिसांनीही समाधान व्यक्त केलं.

तुमच्या शहरातून (मुंबई)

मुंबई

  • विधानपरिषद निवडणूक : अजित पवारांची काँगेस नेत्यांसोबत बैठक; मुख्यमंत्री नाराज, शिवसेनेचं ‘हॉटेल पॉलिटिक्स’

  • 'नाना पटोलेंचं मानसिक संतुलन बिघडतंय, काँग्रेस नेतृत्वास विनंती, रुग्णालयात घेऊन जा', आशिष शेलारांची खोचक टीका

    ‘नाना पटोलेंचं मानसिक संतुलन बिघडतंय, काँग्रेस नेतृत्वास विनंती, रुग्णालयात घेऊन जा’, आशिष शेलारांची खोचक टीका

  • हाताची नस कापून मुंबई उच्च न्यायालयातच आत्महत्येचा प्रयत्न; माजी सैनिकाचं धक्कादायक पाऊल

    हाताची नस कापून मुंबई उच्च न्यायालयातच आत्महत्येचा प्रयत्न; माजी सैनिकाचं धक्कादायक पाऊल

  • गृहमंत्र्यांच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकरांचा विचार बदलला, वंचित बहुजन आघाडीचा मोठा निर्णय

    गृहमंत्र्यांच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकरांचा विचार बदलला, वंचित बहुजन आघाडीचा मोठा निर्णय

  • VIDEO : महिला काँग्रेसचा मुंबईतील ED कार्यालयावरील मोर्चाचा फियास्को, आंदोलकांपेक्षा पोलीस-पत्रकारांचीच संख्या जास्त

    VIDEO : महिला काँग्रेसचा मुंबईतील ED कार्यालयावरील मोर्चाचा फियास्को, आंदोलकांपेक्षा पोलीस-पत्रकारांचीच संख्या जास्त

  • विधानपरिषद निवडणूक : मलिक- देशमुखांचा मतदानाचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला

    विधानपरिषद निवडणूक : मलिक- देशमुखांचा मतदानाचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला

  • विधान परिषदेपाठोपाठ राज्यात आणखी एका निवडणुकीची चर्चा, भाजपचा उमेदवारही ठरला, शिवसेनेला कडवं आव्हान

    विधान परिषदेपाठोपाठ राज्यात आणखी एका निवडणुकीची चर्चा, भाजपचा उमेदवारही ठरला, शिवसेनेला कडवं आव्हान

  • मोठी बातमी, एनडीएतून बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदाच भाजपकडून उद्धव ठाकरेंना फोन, कारण...

    मोठी बातमी, एनडीएतून बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदाच भाजपकडून उद्धव ठाकरेंना फोन, कारण…

  • नुपूर शर्मांना समन्स, रझा अकादमीच्या तक्रारीनंतर मुंबई पोलीस पोहोचले दिल्लीत!

    नुपूर शर्मांना समन्स, रझा अकादमीच्या तक्रारीनंतर मुंबई पोलीस पोहोचले दिल्लीत!

  • विधान परिषद निवडणूक, काँग्रेसच्या गोटात शांतता, भाजप कामाला, महाविकास आघाडीचं नेमकं काय ठरलंय?

    विधान परिषद निवडणूक, काँग्रेसच्या गोटात शांतता, भाजप कामाला, महाविकास आघाडीचं नेमकं काय ठरलंय?

  • 19 वर्ष लेकीला सांभाळलं अन् आईने गळा दाबून संपवलं, आत्महत्येचा बनाव केला पण...

    19 वर्ष लेकीला सांभाळलं अन् आईने गळा दाबून संपवलं, आत्महत्येचा बनाव केला पण…

मुंबई

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source: https://lokmat.news18.com/mumbai/mumbai-police-took-help-of-rat-to-find-10-tola-gold-mhkp-gh-718406.html