मुंबई बातम्या

सलमान खान धमकी प्रकरणात नवी माहिती आली समोर, मुंबई क्राईम ब्रांचची टीम पालघरलमध्ये दाखल – News18 लोकमत

मुंबई, 11 जून- बॉलिवूड अभिनेता सलमान खानला (Salman Khan) धमकीचं पत्र पाठवल्याने एकच खळबळ माजली आहे. गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील ( salman khan threat case ) आरोपी लॉरेन्स बिश्नोईचा साथीदार गुंड विक्रम बराड (Vikram Barad) यानेच हे धमकीचं पत्र सलमान खान यांचे वडील सलीम खान यांच्यापर्यंत पोहोचवलं होतं, अशी माहिती काही दिवसापूर्वी समोर आली होती. आता याप्रकरणात आता नवीन माहिती समोर आली आहे. सलमान खानला मिळालेल्या धमकी पत्राची  चौकशी करण्यासाठी मुंबई क्राईम ब्रांचची टीम पालघरमध्ये दाखल झाली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील जलोरामधून आलेले तीन सस्पेक्ट पालघऱमध्ये थांबले होते. यांची माहिती मिळवण्सासाठी मुंबई क्राईम ब्रांचची टीम पालघरमध्ये दाखल झाली आहे.
मुंबई क्राईम ब्रांचच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खानच्या वडिलांना ज्याठिकाणी धमकीचे पत्र मिळालं त्या जागेच्या मागे बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एक संशयित दिसत आहे. त्याची ओळख अद्याप क्राईम ब्रांचने सांगितलेली नाही. मात्र यासंबंधी माहिती मिळवण्यासाठी मुंबई क्राईम ब्रांचची टीम पालघरमध्ये पोहोचली आहे. पोलिसांना संशय आहे की, सीसीटीव्हीमध्ये दिसणारा संशयित त्या लोकांपैकीच एक आहे जो धमकीचे पत्र ठेवण्यासाठी आला होता.

वाचा-‘धाकड’ फ्लॉप होताच पाहा काय करतेय कंगना, समोर आले PHOTO

पाच जूनला मिळालं होतं धमकीचं पत्र
सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान (Salim Khan) यांना रविवारी (5 जून) धमकीचं पत्र मिळालं होतं. ‘सलमानचाही सिद्धू मूसेवाला करू’, अशी धमकी त्याला देण्यात आली होती. या धमकीची माहिती महाराष्ट्र सरकारच्या गृहविभागाला मिळताच सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सलमानच्या वांद्रे येथील गॅलक्सी अपार्टमेंटच्या बाहेर क्राईम ब्राँचची ( Mumbai Crime Branch) एक टीम तात्काळ दाखल झाली होता. ज्या ठिकाणी धमकीचं पत्र मिळालं त्या ठिकाणी पोलिसांकडून तपास सुरु होता. सलमान स्वत: घराबाहेर येऊन क्राईम ब्राँचच्या टीमला सहकार्य करताना दिसला होता. सलीम खान यांच्या एका सुरक्षा कर्मचाऱ्याला धमकीचं पत्र सापडलं होतं. सलीम खान वॉकला गेल्यानंतर दररोज जिथे रोज विश्रांती करतात तिथे एका बेंचवर हे पत्र सापडलं आहे. या पत्रात सलमान आणि सलीम खान दोघांना गंभीर धमक्या देण्यात आल्या आहेत. “मुसावला जैसा कर दुंगा”, अशा आशयाचं ते पत्र होतं.

वाचा- भर पावसाळ्यात अमेयला लागलेत ‘या’ पदार्थाचे डोहाळे, हे खाऊ का ते… म्हणत पडला धर्मसंकटात?

गेल्या आठवड्यात पंजाबी गायक ‘सिद्धू मूसेवाला’ (sidhu moose wala) याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या हत्येमागे गँगस्टर लॉरेंस बिश्नोई असल्याची माहिती समोर आली होती. सिद्धू मूसेवालाच्या हत्येनंतर अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेत वाढ (salman khans security increase) करण्यात आली आहे. सलमानच्या गॅलक्सी अपार्टमेंट बाहेरची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. कारण लॉरेंस बिश्नोईने याआधी सलमान खानच्या हत्येचा कट रचला होता. लॉरेंसने सलमान खानला (Salman Khan) जीवे मारण्याची धमकी दिली होती. लॉरेसचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ 2021मधील आहे. जेव्हा दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने लॉरेंस आणि त्याच्या गँगला देशातील वेगवेगळ्या राज्यातून मकोका केसअंतर्गत ताब्यात घेतलं होतं. या व्हिडीओमध्ये लॉरेंससह त्याचा साथीदार संपत देखील दिसत आहे. संपत हा लॉरेंसचा राजस्थानचा साथीदार आहे. संपतने सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर रेकी केली होती. पण पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source: https://lokmat.news18.com/entertainment/mumbai-crime-branch-team-arrives-at-palghar-in-front-of-new-information-in-salman-khan-threat-case-715938.html