मुंबई बातम्या

‘मुंबई इंडियन्सला जर खेळवायचं नव्हतं तर लिलावात एवढे पैसे कशाला खर्च केले’ खेळाडूने डागली तोफ… – Maharashtra Times

मुंबई : मुंबई इंडियन्सचा संघाकडून वारंवार मोठ्या चुका घडत आहेत आणि त्यामुळेच त्यांना पराभव पत्करावा लागत आहे. पण जर मुंबई इंडियन्सला खेळायची संधी द्यायची नव्हती, तर त्यांनी लिलावात एवढे पैसे खर्च तरी कशाला केले, असा सवाल विचार एका खेळाडूने मुंबई इंडियन्सवर तोफ डागली आहे.
नेमकं घडलं तरी काय, पाहा…
मुंबई इंडियन्सचा संघ प्रत्येक सामन्यात संघात बदल करत आहे. पण संघातील काही खेळाडूंना ते संधीच देत नसल्याचे आता समोर आले आहे आणि त्यामुळेच त्यांच्यावर भारताचा माजी खेळाडू आणि समालोचक आकाश चोप्राने तोफ डागली आहे. आकाशने यावेळी सांगितले की, ” मुंबई इंडियन्सच्या संघ व्यवस्थापनाचे काहीच कळत नाही. कारण लिलावात त्यांनी तब्बल आठ कोटी रुपये टीम डेव्हिडसाठी मोजले, पण फक्त एकाच सामन्यात संधी देत त्यांनी त्याला संघाबाहेर केले. त्यानंतर त्याला एकही संधी दिली नाही. त्याचबरोबर रायली मेरेडिथसारखा चांगला गोलंदाज त्यांनी संघात घेतला आहे, पण त्यालाही आतापर्यंत एकदाही संधी दिली नाही. त्यामुळे जर या खेळाडूंना संधीच द्यायची नव्हती तर त्यांच्यावर लिलावात पैसेच का खर्च केले. मुंबई इंडियन्सकडून संघ निवडताना बऱ्याच चुका होत आहेत, त्या त्यांनी सुधारायला हव्यात. कारण परदेशी खेळाडूंबाबतचे त्यांचे धोरण अजूनही स्पष्ट नाही. मुंबई इंडियन्सच्या परदेशी खेळाडूंवर विश्वास आहे की नाही, अशी शंकाही यावेळी उपस्थित होत आहे.”
पोलार्ड संघातच बसत नाही…
कायरन पोलार्ड हा मुंबईच्या संघात फिट बसत नाही, असे मोठे वक्तव्य आकाशने यावेळी केले आहे. याबाबत आकाश म्हणाला की, ” मुंबईच्या संघात कायरन पोलार्ड हा फिट बसत नाही. कारण त्यांच्याकडून चांगली कामगिरी होताना दिसत नाही, त्याचबरोबर तो सातत्याने अपयशी ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे. पण तरीही त्याला खेळण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे मुंबईच्या संघाने काही गोष्टींचा विचार करायला हवा आणि त्यानंतरच त्यांनी मैदानात उतरायला हवे.”

Source: https://maharashtratimes.com/sports/cricket/iplt22/news/if-mumbai-indians-dont-want-to-give-chance-then-why-they-waste-money-in-ipl-auction-aakash-chopra-criticizes/articleshow/90880842.cms