मुंबई बातम्या

६ एप्रिल रोजीच ठरलं, हल्ला करायचा, सगळं षडयंत्र सदावर्तेंनी रचलं, मुंबई पोलिसांचे कोर्टात ६ मोठे दावे – Maharashtra Times

मुंबई : शरद पवार यांच्या घरावरील हल्ला हा पूर्वनियोजित कट होता.६ एप्रिल रोजीच ठरलं, पवारांच्या घरावर हल्ला करायचा, सगळं षडयंत्र अॅड गुणरत्न सदावर्तेंनी रचलं. १२ एप्रिलला बारामतीत आंदोलन करायचं, हे सदावर्ते भ्रम करण्यासाठी सातत्याने सांगत होते. पण सगळं नियोजन गुणरत्न सदावर्तेंनी केलं. त्यानुसार ठरल्याप्रमाणे पवारांच्या घरावर एसटी कामगार चालून गेले. पवारांच्या घरावर हल्ला झाला तेव्हा सदावर्तेंना नागपूरमधून फोन येत होते, असे गौप्यस्फोट करत मुंबई पोलिसांनी मोठे दावे कोर्टात केले आहेत.

पवारांच्या घरावरील हल्ल्यासंदर्भात गुणरत्न सदावर्ते यांच्यावर ठपका ठेऊन पोलिसांनी शुक्रवारी रात्री त्यांना अटक केली. शनिवारी कोर्टासमोर हजर केल्यानंतर किला कोर्टाने त्यांना २ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. आज सदावर्तेंची पोलिस कोठडी संपणार आहे. तत्पूर्वी गिरगाव कोर्टात सदावर्ते यांना हजर करण्यात आलं आहे. आज पुन्हा सरकारी वकील अॅड प्र दीप घरत सदावर्ते यांना पोलिस कोठडी मिळावी, यासाठी जोरदार युक्तीवाद करत आहे. सदावर्ते यांची दोन दिवस चौकशी केल्यानंतर चौकशीतून समोर आलेले नवनवे गौप्यस्फोट अॅड घरत कोर्टात करत आहेत.

हल्ल्यादिवशी सदावर्तेंना नागपूरमधून फोन

शरद पवार यांच्या घरावर हल्ला करण्यासंदर्भाचं नियोजन ६ एप्रिल रोजीच आखलं गेलं. अभिषेक पाटील नावाचा कर्मचारी सदावर्ते यांच्या संपर्कात होता. हल्ल्यादिवशी सदावर्ते यांना एक फोन आला, जो नागपूरमधून आला, तो कोण होता, त्याचं नाव आताच सांगू शकत नाही, असं मुंबई पोलिसांच्या वतीने कोर्टात सांगितलं गेलं.

हल्ल्याची पत्रकारांना कल्पना होती

काही पत्रकारांना हल्ल्यावेळी बोलावलं गेलं. MJT न्यूज चॅनेलचे मालक सूर्यवंशी यांना याअगोदरच हल्ल्याची कल्पना होती. त्यांनी इतर पत्रकारांना याबाबतची कल्पना दिली. सदावर्ते यांनी प्लॅन तयार करुन सगळे मेसेज, फोन कॉल डिलीट केले. १२ तारखेला बारामतीत आंदोलन केलं जाणार आहे, असं पोलिसांना आणि सरकारला भ्रमित करण्यासाठी सदावर्ते वारंवार सांगत होते, असंही मुंबई पोलिसांनी कोर्टात सांगितलं.

सदावर्तेंची पोलिस कोठडी वाढवावी

सदावर्ते यांच्या घरचं सीसीटीव्ही फुटेज चेक करणं आणखी बाकी आहे. आम्हाला आणखी सदावर्ते यांची चौकशी करायची आहे. त्यामुळे सदावर्ते यांना आणखी ११ दिवसांची पोलिस कोठडी मिळावी, अशी मागणी मुंबई पोलिसांनी कोर्टात केली.

पोलिसांचे ६ मोठे दावे

  • शरद पवार यांच्या घरावरील हल्ला हा पूर्वनियोजित कट होता.
  • ६ एप्रिल रोजीच ठरलं, पवारांच्या घरावर हल्ला करायचा
  • सगळं षडयंत्र अॅड गुणरत्न सदावर्तेंनी रचलं
  • १२ एप्रिलला बारामतीत आंदोलन करायचं, असं सदावर्ते भ्रम करण्यासाठी सातत्याने सांगत होते
  • पण सगळं नियोजन गुणरत्न सदावर्तेंनी केलं. त्यानुसार ठरल्याप्रमाणे पवारांच्या घरावर एसटी कामगार चालून गेले.
  • पवारांच्या घरावर हल्ला झाला तेव्हा सदावर्तेंना नागपूरमधून फोन येत होते

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/attack-on-sharad-pawar-silver-oak-house-gunaratna-sadawarte-is-responsible-mumbai-police-claim-in-girgaon-mumbai-court/articleshow/90778880.cms