मुंबई बातम्या

मुंबई पालिकेच्या अर्थसंकल्पाला मंजुरी – Loksatta

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ३ फेब्रुवारी रोजी स्थायी समितीत सादर करण्यात आला होता.

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या २०२२-२३ या आर्थिक वर्षांचा ४५ हजार ९४९ कोटी २१ लाख रुपयांच्या अर्थसंकल्पाला पालिका सभागृहाने शुक्रवारी मंजुरी दिली. कोणत्याही चर्चेविना या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. तसेच स्थायी समितीने सुचवलेल्या ६५० कोटींच्या फेरफारासह या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली असल्याचे समजते. पालिकेची मुदत संपण्याच्या दोन दिवस आधी घाईघाईने या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली.

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ३ फेब्रुवारी रोजी स्थायी समितीत सादर करण्यात आला होता. स्थायी समितीने हा अर्थसंकल्प मंजूर करून गुरुवारी सभागृहाच्या पटलावर ठेवला होता. त्यानंतर लगेच एका दिवसात कोणत्याही चर्चेविना या अर्थसंकल्पाला शुक्रवारी मंजुरी देण्यात आली. पालिकेची मुदत येत्या सोमवारी ७ मार्च रोजी संपत असून त्यापूर्वी महत्त्वाचे प्रस्ताव मंजूर करण्यात येत आहेत.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Approval of mumbai municipal corporation budget akp

Next Story

Source: https://www.loksatta.com/mumbai/approval-of-mumbai-municipal-corporation-budget-akp-94-2830570/