मुंबई बातम्या

मुंबई – महिलेचा विनयभंग करणारा एकजण पोलिसांच्या अटकेत I Mumbai Police – Sakal

मुंबई
sakal_logo

By

मुंबई – सीसीटीव्हीच्या आधारे मुंबईतील अंधेरी परिसरात एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेलेल्या २६ वर्षीय महिला वकिलाचा विनयभंग करणाऱ्या व्यक्तीला अंधेरी पोलिसांनी २४ तासांत अटक केली आहे. दरम्यान, अंधेरी पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अविनाश कासार (वय 29) असे असून तो पालघरचा रहिवासी आहे. (Crime Case)

हेही वाचा: शिवसेना खासदारास धमकी देणाऱ्याला अटक

सदर घडलेली घटना ही 20 जानेवारीची आहे. या घटनेतील महिला वकिलाच्या तक्रारीच्या आधारे अंधेरी पोलिसांनी आयपीसीच्या (IPC) कलम 354 आणि 392 अंतर्गत संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहेत. (Mumbai News)

हेही वाचा: मिठागरांवर घरे बांधण्याच्या केंद्राच्या प्रस्तावावर आव्हाड म्हणाले…

दरम्यान, २० जानेवार रोजी संबंधित महिला वकिलाने या व्यक्तीसंदर्भात पोलिसांत तक्रार दिली होती. तिने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी त्याचा तपास सुरु केला. महिला अंधेरी परिसरात एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेली असता त्याने विनयभंगाचा प्रयत्न केला. हे सर्व दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले होते. दरम्यान, तक्रार नोंदवल्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आत त्या व्यक्तीला शोधून त्याच्या मुसक्या आवळण्याचं काम पोलिसांनी केलं आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांच्या या कामगिरीमुळे परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.

Source: https://www.esakal.com/mumbai/andheri-police-arrested-to-criminal-harassment-case-of-advocate-women-sbk97