मुंबई बातम्या

Mumbai Police: असा असतो खरा लोकसेवक, मुंबई पोलिसांमधील कर्मचाऱ्याचा व्हिडीओ होतोय व्हायरल – Lokmat

मुंबई – मुंबई पोलिसांकडून कधी कधी फिल्मी अंदाजामध्ये तर कधी सोशल मीडिया ट्रेंडचा वापर करून जनतेला संरक्षणविषयक नियम आणि मार्गदर्शक सूचनांबाबत माहिती देण्यात येत असते. कोरोनाकाळातही मुंबई पोलिसांकडून या संदर्भात काम करण्यात येत असते. दरम्यान, हल्लीच मुंबई पोलिसांच्या एका कर्मचाऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मुंबई पोलीस दलातील एक कर्मचारी एका दिव्यांग व्यक्तीला हात पकडून रस्ता पार करवून देताना दिसत आहे. हा व्हिडीओ सामान्य नेटिझन्सपासून आयएएस अधिकाऱ्यांनाही आवडला आहे. तसेच तो वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर होत आहे.  

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मुंबईतील एका गर्दी असलेल्या रस्त्यावर गाड्या धावताना दिसत आहेत. तसेच ज्या वृद्ध दिव्यांग व्यक्तीला रस्ता पार करवून दिला जात आहे. ती व्यक्ती छोटी चाके लावलेल्या लाकडाच्या गाडीवर बसली आहे. हा व्हिडीओ पाहून नेटिझन्स या पोलीस कर्मचाऱ्याला अभिवादन करत आहेत.

हा व्हिडीओ मुंबई पोलिसांच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरून मंगळवारी शेअर केला गेला होता. त्याला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, आमची #MrMumbaiPolice संपूर्ण यूनिर्सचे हृदय जिंकत आहे. त्यात पुढे सांगितले आहे की, एचसी राजेंद्र सोनावणे यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रोडवर एका दिव्यांगाला रस्ता पार करून देताना दिसत आहे.

ही क्लिप आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी शेअर केली आहे. त्यांनी त्याला कॅप्शन देताना ते म्हणाले की, दयाळूपणाचे एक छोटेसे उदाहरण. हा व्हिडीओ आतापर्यंत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्याला हजारो लाईक्स मिळाले आहेत.  

Web Title: Mumbai Police: This is how a true public servant, a video of an employee of Mumbai Police goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Source: https://www.lokmat.com/mumbai/mumbai-police-how-true-public-servant-video-employee-mumbai-police-goes-viral-a301/