मुंबई बातम्या

मुंबई : अंधेरीत कोविडचा विळखा कायम | Mumbai corona update – Sakal

मुंबई : मुंबईत कोविड रुग्णांची संख्या (corona patients) पूर्वीच्या तुलनेत कमी झाली असली, तरी अजूनही काही भाग कोविडच्या विळख्यात आहेत. त्यात अंधेरी विभागाचा समावेश असून, कोविडच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत अंधेरीचे रहिवासी कोविडशी झुंज देत आहेत. सध्याही इतर प्रभागांच्या तुलनेत सर्वाधिक इमारती आणि मजले या विभागात सीलबंद आहेत. अंधेरी पश्चिम आणि पूर्व भागात राहणाऱ्या नागरिकांना (corona in andheri) कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाकडून (bmc health authorities) मिळालेल्या आकडेवारीनुसार सध्या आठ इमारती आणि २२० मजले सील करण्यात आले आहेत. सध्या सर्वाधिक ३९३ सक्रिय रुग्ण (corona active patients) अंधेरी (पश्चिम) मध्ये आहेत.

हेही वाचा: शिवाजी पार्कचे मोगल पार्क होऊ देणार नाही; शिवसेनेविरुद्ध भाजप आक्रमक

कोविडच्या आकड्यांवर नजर टाकली तर उपनगराकडे साथीचा प्रादुर्भाव अधिक आढळून येतो. उपनगरातील पाच प्रभागांमध्ये कोविडचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. यात अंधेरी (पश्चिम) ५७ हजार ८०२, बोरिवली पश्चिम ५३ हजार ४७९, अंधेरी (पूर्व) ४८ हजार ३२०, दहिसर ४७ हजार ५१५ आणि मालाडमध्ये ४६ हजार २५ कोविड रुग्णांची सर्वाधिक नोंद झाली आहे.

मुंबईत कोविडचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत आहे. सप्टेंबर महिन्यात मुंबईत १२ हजार २५२ नवीन कोविड रुग्ण आढळले; तर हीच संख्या ऑक्टोबरमध्ये ११ हजार ३०२ इतकी होती. म्हणजेच एका महिन्यात नवीन प्रकरणांमध्ये सात टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे. सप्टेंबरमध्ये १४१ मृत्यू झाले होते; तर ऑक्टोबरमध्ये १०९ मृत्यूंची नोंद झाली होती, म्हणजेच मृतांच्या संख्येत २२ टक्क्यांनी घट झाली आहे.

हेही वाचा: पालघर : चार दिवस बेपत्ता असलेल्या विवाहितेची क्रूर हत्या

“अंधेरी पूर्व किंवा पश्चिम या दोन्ही प्रभागांची लोकसंख्या अधिक आहे. अशा परिस्थितीत सुरुवातीपासून आतापर्यंत संसर्ग झालेल्यांची संख्याही जास्त आहे. ज्या प्रभागात जास्त रुग्ण येतात, त्या प्रभागांना आम्ही अॅलर्ट पाठवतो. शहरातील रुग्ण कमी असले तरी आम्ही सर्व प्रभागांवर लक्ष ठेवून आहोत.”
– डॉ. मंगला गोमारे
कार्यकारी आरोग्य अधिकारी, पालिका

मुंबईची आकडेवारी
एकूण चाचण्या- ११४,५३,१३१
एकूण पॉझिटिव्ह रुग्ण- ७५५९४७
एकूण मृत्यू- १६२४७
पूर्णपणे बरे- ७३३३१८
दुप्पटीचा दर- १५६७ दिवस
चाळ/झोपडपट्टी सील- ०
इमारत सील- ३५

Source: https://www.esakal.com/mumbai/mumbai-corona-update-corona-in-andheri-bmc-health-authorities-corona-active-patients-nss91