मुंबई बातम्या

नवकल्पनांसाठी सामाजिक उद्योजकता स्पर्धा; अभ्युदय IIT बाॅम्बेचा उपक्रम |IIT Bombay – Sakal

मुंबई : युवकांमधील सामाजिक उद्योजकतेला (Social entrepreneurship) चालना देण्यासाठी अभ्युदय आयआयटी बाॅम्बेतर्फे (Abhyuday IIT Bombay) या वर्षी ‘कृती आराखडा : सामाजिक उद्योजकता’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. समाजात बदल घडवून आणणाऱ्या नवकल्पनांना (social changing new ideas) व्यवसाय म्हणून उभे राहता यावे व यातून तळागाळातील समस्या सुटण्यास हातभार लागावा, हे उद्धिष्ट समोर ठेवून ही स्पर्धा आयोजित (Action plan competition) करण्यात आली आहे. अशा नवकल्पना व स्टार्टअपना या स्पर्धेद्वारे व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे. ‘सकाळ’ या स्पर्धेचे माध्यम प्रायोजक (sakal media group) आहे.

हेही वाचा: मुंबईत कोरोनाच्या ४६५ नव्या रुग्णांची भर; ५ जणांचा मृत्यू

देशातील २० राज्यांमध्ये ही स्पर्धा होणार असून कल्पना, नवविचार व अंमलबजावणी, असे या स्पर्धेचे घोषवाक्य आहे. ही केवळ एक स्पर्धा नसून हा नवकल्पनांचा उत्सव असल्याचे अभ्युदय आयआयटी बाॅम्बेने म्हटले आहे. या स्पर्धेतून समाजघटकांवर परिणाम करू शकणाऱ्या सर्व कल्पनांना मार्गदर्शन व पाठिंबा दिला जाणार आहे. आरोग्य, शिक्षण, कृषिक्षेत्रापासून ते महिला सबलीकरण, पाणी नियोजन आणि रोजगार अशा विषयांवर स्पर्धक आपल्या कल्पना व व्यवसायाचा कृती आराखडा या स्पर्धेत सादर करू शकणार आहेत. या स्पर्धेतून अशा नवकल्पना व स्टार्टअपना आपले बिझनेस माॅडेल ठरवण्यासाठी मदत केली जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थी, तज्ज्ञ व्यावसायिक आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव असलेल्या एनजीओंना एकत्र आणले जाणार आहे.

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना पाच महिन्यांत विविध टप्पे पार पाडावे लागणार आहेत. एखादी समस्या समजून घेण्यासाठी संबंधितांशी संवाद साधणे, त्याबाबत उपाय शोधण्यासाठी संबंधितांसोबत काम करणे, गट बनवणे व त्यात यश आले की समाजात त्या उपायाचे प्रमाणीकरण करणे, असे हे टप्पे आहेत. त्यासाठी पाच नोव्हेंबरपर्यंत इच्छुकांना नोंदणी करायची आहे. नोंदणीनंतर संघांची पुढील टप्प्यांसाठी निवड केली जाईल.

१५ लाखांसह विविध सुविधा

१० वर्षांपासून अभ्युदय आयआयटी बाॅम्बेतर्फे सामाजिक उद्योजकता या क्षेत्रासाठी अॅक्शन प्लॅन म्हणजेच कृती आराखडा ही स्पर्धा घेतली जात आहे. या स्पर्धेत ७०० हून अधिक प्रवेशिका येतात. यंदाची स्पर्धादेखील भव्य असणार असून यात १५ लाखांच्या बक्षिसांसह भारत, अमेरिका व युरोपमध्ये स्टार्टअप उभारणीसाठी नेटवर्किंग, मार्गदर्शन, निधीची उभारणी, माध्यमांकडून प्रसिद्धी अशा अनेक बाबींसाठी मदत केली जाणार आहे.

कुठे नोंदणी कराल?

संकेस्थळ – https://actionplan.abhyudayiitb.org/

अंतिम तारीख – पाच नोव्हेंबर

अभ्युदयचे इन्स्टाग्राम पेज – iitbombay_abhyuday

Source: https://www.esakal.com/mumbai/iit-bombay-update-social-entrepreneurship-abhyuday-iit-bombay-social-changing-new-ideas-action-plan-competition-sakal-nss91