मुंबई बातम्या

IPL 2021 : मुंबई इंडियन्सचे खेळाडू सुधारणार तरी कधी, पुन्हा एकदा बसला मोठा धक्का – Maharashtra Times

शारजा : मुंबई इंडियन्सच्या संघातील खेळाडू सुधारणार तरी कधी, असा सवाल आता विचारला जात आहे. कारण मुंबई इंडियन्सच्या संघाकडून आज पुन्हा एकदा मोठी चुक घडली असून त्यांना याचा फटका बसला आहे.
मुंबई इंडियन्सच्या संघाला कशाचा फटका बसतोय, पाहा…
मुंबई इंडियन्सच्या संघाने गेल्यावर्षी युएईमध्येच आयपीएलचे जेतेपद पटकावले होते. पण या सत्रात मात्र मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंना मात्र चांगली कामगिरी करता येत नाहीए. आतापर्यंतच्या प्रत्येक सामन्यात मुंबई इंडियन्सच्या मधल्या फळीने कायम निराशा केल्याचे पाहायला मिळाले आहे. मुंबईच्या संघाने चांगली सुरुवात केली तर त्यांना मधल्या फळीतील अपयशामुळे मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आल्याचे पाहायला मिळत आहे. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात मुंबईची चांगली सुरुवात झाली नाही. सौरभ तिवारी संघाला अडचणीतून बाहेर काढेल असे वाटले. पण तो देखील १५ धावांवर बाद झाला. त्याला अक्षरने पटेलनेच बाद केले. तिवारी पाठोपाठ धोकादायक कायरन पोलार्डला नॉर्जेने ६ धावांवर बाद केले. मुंबईचा निम्मा संघ ८७ धावात पॅव्हेलियनमध्ये गेला. मैदानात असलेले पंड्या बंधू काही तरी कमाल करतील असे वाटले होते. पण हार्दिक १७ धावांवर बाद झाला. त्याला आवेशने बाद केले. त्याच षटकात आवेशने कुल्टर नाईलला बाद करून मुंबईला सातवा धक्का दिला. आतापर्यंत फलंदाजीमध्ये पंड्या बंधू हे सातत्याने अपयशी ठरल्याचे पाहायला मिळत आहेत. आतापर्यंतच्या एकाही सामन्यात या दोघांनी चांगली फलंदाजी करता आलेली नाही आणि त्यामुळेच चाहते त्यांना ट्रोल करत असल्याचे पाहायला मिळाले आहे. आजच्या सामन्यात फक्त सूर्यकुमार यादवला सर्वाधिक ३३ धावा करता आल्या. आज पुन्हा एकदा मुंबईच्या मधल्या फळीकडून मोठ्या अपेक्षा त्यांच्या चाहत्यांना होत्या, पण यामध्ये ते पुन्हा एकदा अपयशीच ठरल्याचे पाहायला मिळाले.

मुंबई इंडियन्सच्या संघाने हा सामना गमावला तर त्यांच्यासाठी प्ले-ऑफची शर्यत कठीण होऊन बसू शकते. कारण मुंबईने हा सामना गमावला तर त्यांना १६ गुण मिळवता येणार नाहीत.

Source: https://maharashtratimes.com/sports/cricket/iplt20/news/ipl-2021-big-blow-to-mumbai-indians-against-delhi-capitals-middle-order-batsmens-failed-again/articleshow/86707287.cms