मुंबई बातम्या

खासगी लसीकरणातही मुंबई अव्वल – Sakal

मुंबई : खासगी क्षेत्रातील लसीकरणात ही मुंबई (Mumbai) ने बाजी मारली आहे. गेल्या नऊ महिन्यात 45 लाखाहून अधिक लोकांचे लसीकरण (Vaccination) झाले आहे. राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत हे लसीकरण अव्वल आहे. सर्वसाधारण लसीकरणात ही मुंबई आणि राज्याने यापूर्वीच बाजी मारली आहे.

राज्यभरातील खासगी क्षेत्रातील लसीकरणाचा विचार केला असता आतापर्यंत एकूण 1 कोटी 10 लाख 14 हजार 422 लाभार्थींचे लसीकरण झाले. त्यातील मुंबईत 45 लाख 73 हजार 895 लसीकरण झाले असून 41.52 टक्के आहे. खासगी रुग्णालय,सामाजिक संस्था आणि राजकीय पक्षांच्या माध्यमातून हे लसीकरण करण्यात येत आहे.

मुंबईतील 517 लसीकरण केंद्रांपैकी साधारणता 137 खासगी केंद्र आहेत. त्या माध्यमातून दिवसाला साधारणता 30 हजार लाभार्थींचे लसीकरण होते. मुंबईतील सर्व केंद्र मिळून दिवसभरातील एकूण लसीकरण हे दीड लाखांच्या वर होते. त्यातील खासगी केंद्रांचा वाटा ही मोठा आहे.

हेही वाचा: पिंपरीत बुधवारी कोव्हिशिल्डचे आणि कोव्हॅक्सिनचे ६५ केंद्रांवर लसीकरण

खासगी क्षेत्रातील लसीकरण

मुंबई – 45,73,895

पुणे -28,49,610

ठाणे -17,75,026

रायगड – 3,59,120

औरंगाबाद – 3,03,006

पालघर – 2,42,336

नाशिक – 2,41,717

नागपूर -1,59,910

सातारा – 1,35,656

कोल्हापूर -1,12,792

एकूण – 1,10,14,422

Source: https://www.esakal.com/mumbai/mumbai-also-leads-in-private-vaccination-psp05