मुंबई बातम्या

मुंबईत मुसळधार पाऊस – Loksatta

मुंबई : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र झाल्याने आणि गुजरातवरही कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने दोन्हींचा संयुक्त परिणाम म्हणून सोमवारी दिवसभर मुंबईसह कोकणात पावसाच्या सरी कोसळत होत्या. मंगळवारी पालघर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी येथे तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. सोमवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत सांताक्रूझ येथे ३९.४ मिमी आणि कु लाबा येथे २५.८ मिमी असा पाऊस नोंदवला गेला. कमाल तापमानातही सरासरीच्या तुलनेत ३ अंशांची घट झाली. कु लाबा आणि सांताक्रूझ येथे २८.२ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले. बुधवारपासून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.

First Published on September 14, 2021 1:30 am

Web Title: heavy rain fall in mumbai akp 94 2

Source: https://www.loksatta.com/mumbai-news/heavy-rain-fall-in-mumbai-akp-94-2-2595207/