मुंबई बातम्या

मुंबई: आज चौपाटीवर गेल्यास असं होणार गणेश मुर्तीचं विसर्जन – Sakal

मुंबई: मुंबईसह राज्यभरात आज दीड दिवसाच्या बाप्पांचे विसर्जन (ganesh immersion) होईल. मुंबईत गणेश मुर्तींच्या विसर्जनासाठी खास व्यवस्था करण्यात आलीय. कोरोनामुळे मागच्यावर्षीप्रमाणे यंदाही गणेश मुर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव (Artificial lake) बनवण्यात आले आहेत. मुंबईच्या वेगवेगळ्या भागात पालिकेच्या मैदानांमध्ये कृत्रिम तलाव बनवण्यात आले आहेत.

मागच्यावर्षी मुंबईकरांनी या कृत्रिम तलावांमध्ये गणेश मुर्ती विसर्जित करण्याला चांगला प्रतिसाद दिला होता. यंदाही तसाच प्रतिसाद मिळेल अशी पालिकेला अपेक्षा आहे. विसर्जनासाठी चौपाट्यांवर गर्दी उसळून कोरोनाचा अधिक फैलाव होऊ शकतो. त्यामुळे पालिकेने खबरदारी म्हणून असे कृत्रिम तलाव उभारले आहेत.

हेही वाचा: Sakinaka rape case: ‘भय इथले संपत नाही…’, चित्रा वाघ यांचा हल्लाबोल

मुंबईत सार्वजनिक उत्सव मंडळांबरोबरच घरघुती गणपतींची संख्याही मोठी आहे. दरम्यान दादर शिवाजी पार्क मधील कृत्रिम तलावात गणपती बाप्पाची पहिली मुर्ती विसर्जित करण्यात आलीय. पालिकेने प्रत्येक प्रभागात मुर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार केले आहेत. यंदा पालिकेने मुर्ती विसर्जनासाठी नियम घालून दिले आहेत, यानुसार मूर्ती विसर्जित करण्यासाठी कृत्रिम कुंडाजवळ किंवा समुद्रावर गेल्या नंतर उपस्थित पालिकेचे तैनात असलेले कर्मचारी ती मूर्ती स्वतःकडे घेऊन विसर्जित करणार आहेत. विर्सजनानंतर भक्तांना थोडी माती देण्यात येईल. गिरगाव चौपाटीवर मुर्ती विसर्जित करायची असल्यास ऑनलाइन विसर्जनासाठी वेळ घ्यावी लागणार आहे.

Source: https://www.esakal.com/mumbai/mumbai-ganesh-immersion-at-chowpaty-and-artificial-lake-dmp82