मुंबई बातम्या

मुंबई : कोरोनाचे फक्त 395 गंभीर रुग्ण – Sakal

मुंबई : सर्वाधिक कोरोना (Corona) बाधित रुग्ण सापडणाऱ्या मुंबईत (Mumbai) कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्याचे दिसते. विविध रुग्णालयांत केवळ 2975 रुग्णांवर उपचार सुरू असून त्यातील 395 रुग्ण गंभीर असल्याची माहिती पालिकेने आपल्या अहवालात दिली आहे..

रविवारी 44,124 कोरोना चाचण्या केल्या असून तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. आता पर्यंत 91,77,752 एवढया चाचण्या झाल्या आहेत.मुंबईतील बरे झालेल्या रूग्णांचा दर 97 टक्के असून कोविड वाढीचा दर 0.05 टक्के आहे.मुंबईतील रूग्ण दुपटीचा कालावधी 1,611 दिवस इतका आहे.

हेही वाचा: राज्यातील अंगणवाडी सेविका एक लाख मोबाईल परत करणार

मुंबईतील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी झाल्याचे दिसते. कोविड रुग्णांसाठीच्या एकूण रुग्णशय्यापैकी 87 टक्के रुग्णाशय्या रिक्त आहेत. सध्या रुग्णालयांतील केवळ 5 टक्के रुग्णशय्या कोविड रुग्णांसाठी ठेवण्यात आल्या असून नव्याने येणाऱ्या रुग्णांना कोविड काळजी केंद्रामध्ये दाखल केले जात आहे.

  • रुग्णालयांत दाखल रुग्ण – 2,974

  • गंभीर रुग्ण – 390

  • लक्षणे असणारे रुग्ण – 1305

  • लक्षणे विरहित रुग्ण – 1,279

हेही वाचा: धावत्या मेट्रोत लग्नाची बोलणी अन्‌ साखरपुडाही

रुग्णशय्या प्रकार एकूण भरलेले रिक्त

  • ऑक्सिजन – 7606 754 6852

  • आयसीयू – 2249 615 1634

  • व्हेंटिलेटर – 1290 405 885

कोरोना संसर्ग नियंत्रणात आल्याने मुख्य रुग्णालयांमध्ये इतर उपचार व शस्त्रक्रिया सुरू केल्या आहेत. मुख्य रुग्णालयांत केवळ 5 टक्के रुग्णशय्या कोविड रुग्णांसाठी असून आवश्यकतेनुसार त्यात वाढ करण्यात येईल. उपचारासाठी कोविड केंद्रांचा वापर अधिक करण्यात येत आहे.

-डॉ. रमेश भारमल, संचालक, पालिका वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये

Source: https://www.esakal.com/mumbai/mumbai-only-395-critical-corona-patients-drl98