मुंबई बातम्या

मुंबई : ड्रग्स प्रकरणात अभिनेत्याला अटक – Loksatta

ड्रग्स प्रकरणी मुंबईतील एका अभिनेत्याला अटक करण्यात आली आहे. टेलिव्हिजन अभिनेता गौरव दीक्षित याला शुक्रवारी (२७ ऑगस्ट) नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीने (NCB) मुंबईहून अटक केली आहे. गौरवच्या घरावर एनसीबीकडून टाकण्यात आलेल्या या छाप्यात एमडी ड्रग्स, चरस आणि इतर ड्रग्स जप्त करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. अभिनेता एजाज खान ड्रग्स प्रकरणातील चौकशीच्या आधारे गौरवला ही अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

विशेष म्हणजे ड्रग्स प्रकरणात एनसीबीने अजाज खानला मार्च महिन्यात अटक केली होती. ड्रग्स प्रकरणात ड्रग पेडलर शादाब बटाटा याला अटक केल्यानंतर अभिनेता एजाज खान याचं नाव समोर आलं होतं. एजाज खानवर शादाब बटाटा यांच्या टोळीचा भाग असल्याचा आरोप आहे. शादाब बटाटा हा मुंबईतील सर्वात मोठा ड्रग्स सप्लायर फारुख बटाटा याचा मुलगा आहे. दरम्यान, एनसीबीने यापूर्वी जेव्हा शादाब बटाटाला याला अटक अटक केली होती तेव्हा सुमारे २ कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त करण्यात आले होते.

आम्ही त्याला शोधतच होतो!

शादाब बटाटा याच्यावर मुंबईतील बॉलिवूड सेलिब्रिटींना ड्रग्स पुरवल्याचा आरोप आहे. फारुख सुरुवातीला बटाटे विकायचा. त्यानंतर तो अंडरवर्ल्डच्या काही लोकांच्या संपर्कात आला आणि मुंबईतील सर्वात मोठा ड्रग्स सप्लायर झाला. तर आता त्याच हे संपूर्ण काम त्याच्या दोन्ही मुलांनी आपल्या हातात घेतल्याची माहिती मिळते. एनसीबीचे एक अधिकारी म्हणाले कि, “आम्ही त्याला शोधतच होतो. अखेर शुक्रवारी त्याला अटक करण्यात आली आहे. आता कोठडीसाठी न्यायालयात त्याला हजर केले जाईल.”

NCB ने यापूर्वी एप्रिल महिन्यामध्ये गौरव दीक्षित यांच्या मुंबईतील लोखंडवाला येथील निवासस्थानी छाप्यात त्यांना अंमली पदार्थ सापडले होते. मात्र, तेव्हा तो घरी नव्हता. त्यानंतर एनसीबीनंतर त्याला आरोपी म्हणून घोषित केलं आणि ते त्याच्या शोधात होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.

First Published on August 28, 2021 7:33 am

Web Title: television actor gaurav dixit arrested in drug case mumbai house gst 97

Source: https://www.loksatta.com/mumbai-news/television-actor-gaurav-dixit-arrested-in-drug-case-mumbai-house-gst-97-2578549/