मुंबई बातम्या

कोरोनाची कृपा! मुंबई युनिव्हर्सिटीच्या दुसऱ्या मेरीट लिस्टमध्येही Cut-Off नव्वद टक्क्यांच्या वरच; इथे चेक क… – News18 लोकमत

मुंबई, 25 ऑगस्ट: कोरोनामुळे यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल ऐतिहासिक पद्धतीनं लावण्यात आला. त्यात आता वेध लागले आहेत ते कॉलेज प्रवेशाचे (College Admissions). मुंबई युनिव्हर्सिटीमधील विविध अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेशाचे (Mumbai University UG Admissions 2021) अर्ज मागवण्यास सुरुवात झाली आहे. आज संध्याकाळी सात वाजता प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर (MU 2nd Merit List) करण्यात आली. मात्र यंदा दुसरी गुणवत्ता यादी जाहीर होऊनही Cut Off मार्क्स (Cut Off Marks) नव्वद टक्क्यांच्या खाली येण्याचं नाव घेत नाहीयेत.

यंदा विशेष मूल्यांकन पद्धतीनं दहावी आणि बारावीचा निकाल लावण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना भरघोस मार्क्स देण्यात आले आहेत. यंदा निकालाची टक्केवारीही नेहमीपेक्षा अधिक असल्यामुळे आपोआपच Cut Off मार्क्स वाढले आहेत. मुंबई युनिव्हर्सिटीतील काही टॉप कॉलेजेसचा Cut Off हा तब्बल 92 टक्क्यांच्या वर आहे.

मुंबईतील रुईया कॉलेजमधील BMM आर्ट्स चा Cut Off 95%, BMM कॉमर्सचा Cut Off 93.67%, BMM सायन्सचा Cut Off 92.17% आहे. तर B.Sc  वर्षाचा Cut Off 84 % आहे आणि कम्युटर सायन्सचा Cut Off 92.80% आहे. तसंच हिंदुजा कॉलेज, साठे कॉलेज, विल्सन कॉलेज आणि सेंट झेव्हिअर्स कॉलेज इत्यादी कॉलेजेसचा Cut Off ही तब्बल 90 टक्क्यांच्या वर आहे.

हे वाचा – Career Advice: सिटी अँड टाऊन प्लॅनर म्हणून घडवू शकता करिअर; मिळेल भरघोस पगार

विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळालेले असल्यामुळे दुसऱ्या गुणवत्ता यादीतही कट-ऑफची पातळी जास्त आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 14 ऑगस्टपर्यंत प्री-एन्रोलमेंट फॉर्म्ससह (Pre-Enrollment Forms) अॅडमिशन फॉर्म्स (Admission Form) सादर केले आहेत, ते या अॅडमिशन प्रक्रियेत पुढे जाण्यास पात्र असतील, असं विद्यापीठातर्फे कळवण्यात आलं आहे.

पहिली गुणवत्ता यादी 18 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झाली होती. त्यात अनेक कॉलेजेसमध्ये कट-ऑफने (Mumbai University Cut-Off) 98 टक्क्यांची पातळी गाठली होती. यापाठोपाठ आता दुसऱ्या गुणवत्ता यादीनं आता 90-92 टक्क्यांची पातळी गाठली आहे.

मुंबई विद्यापीठाची प्रथम वर्ष प्रवेशाची गुणवत्ता यादी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

Source: https://lokmat.news18.com/mumbai/second-merit-list-of-mumbai-university-admissions-released-cut-off-marks-high-due-to-high-percentage-of-students-mham-597162.html