मुंबई बातम्या

मुंबई मेट्रोला मिळाला ‘प्रोजेक्ट एक्सलन्स अवॉर्ड’ – Sakal

मुंबई : प्रोजेक्ट मॅनेजर्स ग्लोबल (Project Managers Global) समिट 2021 च्या उद्घाटन समारंभात मुंबई (Mumbai) मेट्रो रेल (Metro Rail) कॉर्पोरेशनला ‘प्रोजेक्ट एक्सलन्स अवॉर्ड’ (‘Project Excellence Award)’ प्रदान करण्यात आला. आयपीएमएचे (IPM) सदस्य, प्रोजेक्ट मॅनेजमेंट असोसिएट्स (पी.एम.ए.) इंडियाचे प्रादेशिक संचालक टी.श्रीनिवासन (T.Srinivasan) यांनी हा पुरस्कार (Award) प्रदान केला. राष्ट्रीय स्तरावर निवडलेल्या एकूण चार प्रकल्पांमध्ये मुंबई मेट्रोला (Mumbai Metro) हा पुरस्कार मिळाला.

प्रोजेक्ट मॅनेजमेंट असोसिएट्सचा वार्षिक कार्यक्रम या वर्षी व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मवर आयोजित करण्यात आला. या वर्षी ग्लोबल समिटची थीम ‘प्रोजेक्ट मॅनेजमेंट ऑप्टिमायझेशन फॉर रिझिलियन्स अँड सस्टेनेबिलिटी’ होती. 23 आणि 24 ऑगस्ट 2021 रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पी.एम.ए. राष्ट्रीय पुरस्कार दरवर्षी चांगल्या प्रकारे राबवल्या जाणाऱ्या प्रकल्पांचे यश आणि कामगिरी साजरा करण्यासाठी आयोजित केला जातो.

हेही वाचा: मुंबई : मलेरियाचे दोन हजारांवर रुग्णवाढ; त्यापाठोपाठ गॅस्ट्रो आणि हेपेटायटिसचे रुग्ण वाढ

हा पुरस्कार एक सन्मान आहे, तो आम्हाला नक्कीच प्रोत्साहन देईल. आधुनिक अभियांत्रिकी प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी प्रेरणा देखील देईल, असे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांनी सांगितले.

Source: https://www.esakal.com/mumbai/mumbai-metro-receives-project-excellence-award