मुंबई बातम्या

Mumbai BDD Chawl : इंग्रजांनी बंदींसाठी उभारली होती बीडीडी चाळ, जाणून घ्या इतिहास! – News18 लोकमत

मुंबई, 01 ऑगस्ट : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबईच्या मध्यवर्ती भागात वसलेल्या वरळी येथील बीडीडी चाळ (mumbai bdd chawl) पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसन इमारतींच्या बांधकामाच्या शुभारंभाचा अखेर मुहूर्त निघाला आहे.  राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आज कार्यक्रम संपन्न होणार आहे.  बीडीडी चाळ कारागृह म्हणून उभारण्यात आली होती आता मात्र तिचं रुपडं आता पालटणार आहे. बीडीडी चाळचा ( BDD Chawl Worli History) हा इतिहास…

ब्रिटिश राजसत्तेच्या काळात उठाव झाले, अनेक आंदोलनकर्त्यांना जेरबंद करून तुरुंगात डांबण्यात आलं. तुरुंगाची संख्या कमी पडू लागली त्यावेळी, लॉर्ड एल्फिन्स्टन तत्कालीन मुंबई गव्हर्नर यांनी आंदोलनकर्त्यांसाठी कारागृहच्या बांधकाम करण्याचे आदेश (BDD Chawl Worli History, Evidence of historical events) दिले. 1924 मध्ये किंग एडवर्ट यांनी हे बांधकाम पूर्ण केले. स्वातंत्र्य लढ्यातील बंदीना या कारागृहात ठेवण्यात आलं होतं. स्वतंत्र मिळाल्यानंतर, या इमारती पडीक होत्या. इमारतीची स्वच्छता राहावी यासाठी 4 इमारती सफाई कामगारांना देण्यात आल्या. पुढे इथे गिरणी कामगार राहायला आले. हळूहळू या इमारतीत कुटुंब राहू लागली.

जलसंपदा विभाग उस्मानाबाद इथे सेवानिवृत्त इंजिनिअर्ससाठी नोकरीची संधी

वरळी, नाम जोशी आणि परळ नायगाव असे तीन ठिकाणच्या चाळी मिळून 34.05 हेक्टर हा परीसर आहे. सर्वात मोठ्या वरळी चाळीत 121 इमारती आणि 9680 घरं आहेत. तीन चाळी मिळून 15 हजार घर आणि 8 हजार व्यापारी गाळे असा हा पसारा आहे. एक घर 160 स्वेअर फूट आहे. 1996 ला युती सरकारच्या काळात बीडीडी चाळ पुनर्विकास मुद्दा पुढे आला. त्यावेळी हा 200 स्केअर फूट घर मिळावं ही मागणी पुढे आली. पण हा प्रस्ताव पुढे गेला नाही. त्यानंतर गृहनिर्माण मंत्री रोहिदास पाटील असताना 300 फुटाचं घर मिळावं ही मागणी पुढे आली पण विरोधातून हा प्रकल्प जैसे थे राहिला.

2018 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 500 sqft चं घर मिळावं अशी मागणी पुढे आली. मागणी मान्य होऊन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. आता पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थित भूमिपूजन होत आहे. 15 हजार 593 घर 8120 व्यापारी गाळे बांधण्याचा प्रस्ताव आहे आधी 22 मजला इमारत प्रस्ताव होता. आता 40 मजला इमारत याठिकाणी होणार आहे.   गेले अनेक वर्षे पुनर्विकासच्या प्रतीक्षेत आलेल्या बीडीडी चाळीतल्या रहिवाशीसाठी जशी आनंदाची बाब आहे तशा त्यांच्या मनात शंका देखील आहेत.

आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था मुंबई इथे पदभरती; ‘या’ पदांसाठी करा अर्ज

भूमिपूजनचा दिवस आला तरी देखील करार का करण्यात येत नाही ? 22 मजल्याची इमारत आता अचानक 40 मजल्याची का केली? इमारतीत मेंटनेन्स कोण करणार? महापालिकाची पाणीपट्टी , घरपट्टी कोण भरणार? असे दैनंदिन प्रश्न उपस्थित होणं साहजिकच आहे. त्यात या भागाच्या जवळ अनेक खाजगी व्यावसायिकांनी घरं खाली केली पण ट्रान्झिस्ट कॅम्प दिलेच नाही. ही उदाहरण ताजी आहेत. यामुळे ट्रान्झिस्ट कॅम्पमध्ये घरं हवीत अन्यथा म्हाडाच्या इमारतीत घर मिळावी ही मागणी पुढे आली.

करार केल्याशिवाय घर शासन ताब्यात घेणार नाही असं आश्वासन माजी गृहनिर्माण राज्य मंत्री सचिन अहिर यांनी न्यूज 18 लोकमतसोबत बोलताना दिलं आहे. पुढे ही इमारत 5 वर्षात पूर्ण करण्याचा राज्यसरकारचा संकल्प आहे. गेले अनेक वर्षांच्या प्रतिक्षानंतर बीडीडी चाळीतील नवीन पिढी नव्या स्वरूपात नव्या घराच्या आशेवर लागली आहे.

Published by:sachin Salve

First published:

Source: https://lokmat.news18.com/mumbai/mumbai-bdd-chawl-bdd-chawl-was-set-up-by-the-british-for-banishment-know-the-history-mhss-mhpsm-586640.html