मुंबई बातम्या

पुणे मुंबई परिसरातील पर्यटनस्थळे जमावबंदी जाहीर, यादी वाचा Puneri Speaks – PuneriSpeaks

पुणे मुंबई परिसरातील पर्यटनस्थळे आता जमावबंदी कायद्याखाली बंद केली गेली असून अनेक पर्यंतनस्थळांवर १४४ कलम लावले गेले आहे. कोरोना तिसरी लाट येण्याआधी आणि दुसरी लाट जाता जात नाही या भीतीने स्थानिक प्रशासनाने लोणावळा सह आजूबाजूच्या पर्यंतनस्थळांवर जमावबंदी लागू केली आहे. यासह एक किमी परिसरात वाहनांना मनाई केली देखील करण्यात आली आहे.

शनिवार रविवार सुट्टीनिमित्त नागरिक व पर्यटक या पर्यटनस्थळी गर्दी करून कोरोना संक्रमनास मदत करत होते. आता जमावबंदी केल्यामुळे फिरायला येणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचे लोणावळा पोलिसांनी बजावले आहे.

पुणे मुंबई परिसरातील पर्यटनस्थळे जमावबंदी ठिकाणे?

टायगर, लायन्स, शिवलिंग, मंकी व राजमाची पॉइंट, अमृतांजन ब्रिज, भुशीडॅम, घुबड तलाव, पवना, लोणावळा, तुंगाली, वलवण , उकसान, शिरोता धरण परिसर, कार्ला, भाजे, बेडसे लेणी, लोहगड, विसापूर, तिकोणा गड व किल्ला परिसर

या सर्व ठिकाणी एक किलोमीटर परिसरात जमावबंदी चे नियम लागू करण्यात आले आहेत.

कोणते प्रतिबंध लावण्यात आले आहेत?

  • पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींना वरील नमूद ठिकाणी एकत्र येण्यावर प्रतिबंध
  • पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या व खोल पाण्यात उतरणे व पोहण्यास प्रतिबंध .
  • धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे.
  • पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबे, डोंगर-दऱ्यांचे कठडे, धोकादायक वळणे याठिकाणी सेल्फी काढण्यास व चित्रीकणास प्रतिबंध
  • पर्यटनस्थळे व नैसर्गिक धबधब्याच्या परिसरामध्ये मद्यपान करणे, मद्य बाळगणे, मद्य पिऊन वाहतूक करणे, अनाधिकृत मद्य विक्री करणे व सार्जनिक ठिकाणी उघड्यावर मद्य सेवन करण्यास प्रतिबंध
  • वाहतुकीचे रस्ते तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबविण्यास प्रतिबंध.
  • बेदरकारपणे वाहन चालवणे, धोकादायक स्थितीत वाहन ओव्हरटेक करणे.
  • सार्वजनिक ठिकाणी खादयपदार्थ, कचरा, काचेच्या व प्लास्टिकच्या बाटल्या व थरमाकॉलचे व प्लास्टिकचे साहित्य उघडयावर व इतरत्र फेकणे.
  • सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या महिलांची छेडछाड, टिंगल, टवाळी करणे, महिलांशी असभ्य वर्तन करणे, असभ्य हावभाव करणे, शेरेबाजी करणे .
  • धबधब्याच्या १ किलोमीटर परिसरात वाहनांना बंदी

या नियमांमुळे आता पर्यटनस्थळी जाण्याचा विचार असेल तर कारवाईसाठी तयार राहा.

अशा अनेक बातम्यांसाठी आमच्या ट्विटर खात्याला भेट द्या

©PuneriSpeaks

Like us on FB Page, Twitter, and Instagram

MORE:

Source: https://punerispeaks.com/pune-mumbai-tourist-spots-banned-for-tourists-due-to-covid/