मुंबई बातम्या

मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकांत ४८६ अंकांची घसरण – News On AIR – News Services Division, All India Radio News

मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकांत आज दिवसअखेर ४८६ अंकांची घसरण झाली. आणि तो ५२ हजार ५६९ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही १५२ अंकांनी घसरुन १५ हजार ७२८ अंकांवर बंद झाला.

रिलायन्स इंडस्ट्रीइज, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक यासारख्या बड्या कंपन्यांचे समभाग आज घसरले. टेक महिंद्रा, बजाज ऑटो, पॉवर ग्रीड, एचसीएल टेक्नोलॉजीइज, इंड्सइंड बँक यांचे समभाग तेजीत राहिले.

Source: https://newsonair.com/marathi/2021/07/08/mumbai-stock-exchange-index-fell-486-points/