मुंबई बातम्या

mumbai rains live update: मध्य रेल्वेवरील सीएसएमटी-कुर्ला स्थानकादरम्यानची अप दिशेची वाहतूक बंद – Maharashtra Times

मुंबईः मान्सूनचं आज मुंबईत आगमन झाल्यानंतर मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पहिल्याच पावसात सायन, किंग्ज सर्कल परिसरात पाणी साचलं आहे. मुसळधार पावसामुळं मुंबई रेल्वेलाही (mumbai local) फटका बसला आहे. (mumbai rains live update)

मुंबई लोकल बंद असल्यानं नोकरदार वर्गानं रस्ते वाहतूकीचा पर्याय निवडला आहे. त्यामुळं पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. दृष्यमानता कमी झाल्यानं महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

– दादरः अप- डाऊन दोन्ही मार्गावरील रेल्वे वाहतूक बंद

– वसई, नालासोपाऱ्यात पावसाला सुरुवात; २४ तासांत मुसळधार पावसाचा अंदाज

– मुंबईः संपूर्ण महाराष्ट्रात पुढील २- ३ दिवसांत मान्सून सक्रीय होणार

– पश्चिम रेल्वेची अंधेरी- सीएसएमटी वाहतूक बंद ठप्प

– पहिल्याच पावसात हिंदमाता परिसर जलमय

– पावसाचा जोर वाढला; ठाणे- सीएसएमटी लोकल बंद

– चुनाभट्टी रेल्वे स्थानकात पाणी साचले; वाशी- सीएसएमटी वाहतूक सेवा ठप्प

– मुसळधार पावसामुळं वाहतूक कोंडी; पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

– किंग्स सर्कल परिसरात पाणी साचले; वाहतुकीस अडथळा

– ट्रॅकवरील पाणी ओसरल्यानंतर रेल्वे सेवा पुन्हा सुरु करण्यात येणार

– सायन- कुर्ला रेल्वे स्थानकांत पाणी साचले; मध्य रेल्वेवरील सीएसएमटी-कुर्ला स्थानकादरम्यानची अप दिशेची वाहतूक बंद

– गांधी मार्केटपरिसरात पाणी साचले; वाहतुकीवर परिणाम

– मुंबईः मध्य रेल्वेची वाहतून धिम्या गतीने सुरु

– मुंबईः सायन, कुर्ला रेल्वे स्थानकात पाणी साचले

– मुंबईः पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी; महामार्गावर वाहनांच्या रांगा

– ठाणे, पालघर परिसरात पावसाचा जोर कायम, ठाण्यात सकाळी ८ पर्यंत २२. ६१ मिमि पावसाची नोंद

– मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात

– मान्सून एक दिवस आधीच मुंबईत दाखल; हवामान विभागाची माहिती

वाचाःमुंबईत मान्सूनची दमदार एन्ट्री; पहिल्याच पावसात पाणी साचलं

मुंबईसह उपनगरात पावसाची दमदार हजेरी

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/mumbai-rains-live-update-streets-get-waterlogged-as-mumbai-receives-heavy-rainfall/articleshow/83360350.cms