मुंबई बातम्या

मुंबईत दारोदारी जाऊन लसीकरण करण्याची परवानगी हवी: इक्बाल चहल – Maharashtra Times

मुंबई: मुंबईतील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मुंबईत काही लोकांसाठी घरोघरी जाऊन लसीकरण करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. महापालिकेने या लसीकरणासाठी राज्य सरकारकडे परवानगी मागितली आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी ही माहिती दिली आहे. (we want permission to go door to door in mumbai for vaccination says bmc commissioner iqbal chahal)

पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी प्रसारमाध्मांच्या प्रतिनिधींशी बोलताना ही माहिती दिली. आयुक्तांनी वांद्रे कुर्ला संकुलातील जम्बो कोविड सेंटरमध्ये करोना प्रतिबंधक लस घेतली. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला.

महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी माहिती देताना सांगितले की, मुंबईत १६ जानेवारीपासून पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे. आता ४ एप्रिल रोजी फ्रंटलाईन वर्कर्सना लस देण्यात येईल. आतापर्यंत दहा लाखांच्या वर लसीकरण झालेले आहे.

वांद्रे-कुर्ला संकुलातील जम्बो कोविड सेंटर हे देशातील सर्वात मोठे लसीकरण केंद्र असल्याचे ते म्हणाले. सध्या मुंबईत दर दिवशी ४० हजार जणांना लस देण्यात येत आहे. ही संख्या लवकरच एक लाखावर नेण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे, अशी माहिती आयुक्त चहल यांनी दिली आहे. त्यासाठी खासगी रुग्णालयांना लसीकरणाची परवानगी देण्यात यावी अशी महापालिकेने केंद्र सरकारला विनंती केल्याचेही ते म्हणाले.

मुंबईत लसीकरणाचा वेग वाढवण्याची आवश्यकता असल्याचे चहल म्हणाले. मुंबईतील खासगी रुग्णालयांना लसीकरणाची परवानगी दिल्यास मुंबईत अतिरिक्त १३ हजार नागरिकांचे लसीकरण होऊ शकणार आहे. मुंबईतील खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण अधिक संख्येने केल्यास निश्चितच लसीकरणाचा वेग वाढवणार असल्याचे ते म्हणाले. काही लोकांचे लसीकरण दारोदारी जाऊनही केले जाऊ शकते. तशी परवानगी केंद्र सरकारकडे करण्यात आल्याचे ते म्हणाले. त्यावर लवकरच निर्णय झाल्यास लसीकरणाचा वेग वाढू शकेल.

क्लिक करा आणि वाचा- करोनाचा संसर्ग वाढला; राज्य सरकारनं घेतला मोठा निर्णय

मुंबईत ६९ हजारांहून अधिक लक्षणे नसलेले रुग्ण

मुंबईत १० फेब्रुवारीपासून कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आहे. गेल्या ४८ दिवसांमध्ये ८५ हजार कोरोना रुग्ण सापडले आहेत. त्यांपैकी ६९ हजार ५०० रुग्णांना करोनाची कोणतीही लक्षणे दिसली नव्हती. १० फेब्रुवारीला ३ हजार ५०० खाटा भरल्या होत्या. त्यानंतर काल रात्री ९ हजार ९०० इतक्या खाटा भरल्या गेल्या. खासगी रुग्णालयात २ हजार ४०० इतके बेड ठेवण्यात आले आहेत. ते वाढवून आता ४ हजार ९०० इतके करण्यात येणार आहेत, असे चहल यांनी सांगितले.

क्लिक करा आणि वाचा- सरस्वती सन्मान पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक डॉ शरणकुमार लिंबाळे यांना जाहीर

२ हजार २०० खाटा खासगी रुग्णालये, १ हजार ५०० खाटा वांद्रे-कुर्ला संकुल आणि १ हजार खाटा नेस्को, अशा मिळून ७ हजार रिकाम्या खाटा तयार असल्याचेही चहल म्हणाले. या सोबत इतर व्यवस्थाही आपण वाढवणार असल्याचे ते म्हणाले. तसेच ९ हजार खाटा जम्बो कोविड सेंटरमध्ये देखील असतील, असे ते म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा- यूपीएचं नेतृत्व शरद पवारांनी करावं?; बाळासाहेब थोरात म्हणतात…

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/we-want-permission-to-go-door-to-door-in-mumbai-for-vaccination-says-bmc-commissioner-iqbal-chahal/articleshow/81761257.cms