मुंबई बातम्या

मुंबई-नाशिक महामार्गाने घेतला मोकळा श्वास! उड्डाणपुलाच्या कामाला वेग – Sakal

घोटी (नाशिक) : घोटी शिवारात मुंबई- नाशिक महामार्गावर न्हाईडी डोंगर ते खंबाळे परिसरात जंक्शन उड्डाणपुलाच्या कामाने वेग घेतला आहे. या महामार्गावर असलेली अनधिकृत बांधकामे जेसीबीने काढून टाकल्याने परिसरातील महामार्गाने मोकळा श्वास घेतला आहे. 

मुंबई-नाशिक महामार्गाने घेतला मोकळा श्वास 
मुंबई- नाशिक महामार्गावरील अनधिकृत बांधकामे अपघातास कारणीभूत ठरत होती. यातून वाहनचालकांना महामार्गावर वाहन वळविताना व वाहनात बिघाड झाल्यास महामार्गाच्या बाजूला वाहन उभे करताना स्थानिकांच्या वादाला तोंड द्यावे लागत होते. यातून हाणामारीलाही कधी-कधी परप्रांतीय वाहनचालकांना सामोरे जावे लागत होते. महामार्गात संपादित व उर्वरित जागेत अनेकांनी अतिक्रमण करत महामार्गावर व्यवसाय टाकले होते. अतिक्रमण करण्याची दिवसागणिक स्पर्धा वाढून महामार्ग व्यापण्याचा धडाका लावला होता. यातून अनेकांनी अनधिकृत भाडेतत्त्वावर दुकाने चालवण्यासाठी दिली होती.

हेही वाचा – लग्नाच्या दोनच दिवसांत नवरी पसार! पुण्यातील नवरदेवाची लाखोंची फसवणूक

अनधिकृत बांधकामे हटविली

ही सर्व अतिक्रमणे जंक्शन उड्डाणपूल बांधकामामुळे काढून टाकण्यात आली. वळण घेताना पुढील वाहन अतिक्रमणामुळे वाहन चालकास दिसत नव्हते. त्यातून अपघात होत असत. भरधाव चालणारा महामार्ग अतिक्रमणामुळे संथ गतीने सुरू होता. यामुळे परिसरात नित्याच्या वाहनकोंडीने वाहनचालक हैराण होत. केंद्रीय वाहतूक महामार्गाने हा परिसर अपघात केंद्र म्हणून घोषित केला होता. 

हेही वाचा – ऑनलाइन गेम ठरतायत विद्यार्थ्यांच्या भविष्याला घातक! मानसिक गुंता सोडविण्यासाठी तज्ज्ञांकडे गर्दी 

राजकीय दबाव वापरून व्यत्यय 
अतिक्रमण काढताना अनेकांनी राजकीय दबाव आणून कामात व्यत्यय आणण्यासाठी प्रयत्न केले. नागरिकांत उलटसुलट बातम्या पेरून सरकारी कामात अडथळा आणण्याचेही प्रयत्न केले गेले. आंदोलनाचे प्रयत्न झाले. मात्र, सरकारी यंत्रणेने नियमानुसार कामकाज केल्याने जंक्शन उड्डाणपुलाच्या युद्धपातळीवरील कामाने महामार्गाने पंधरा वर्षांनंतर पहिल्यांदाच मोकळा श्वास घेतला.  

Source: https://www.esakal.com/uttar-maharashtra-news/nashik/mumbai-nashik-highway-got-relief-nashik-marathi-news-408518