मुंबई बातम्या

मुंबई पालिका आगामी शैक्षणिक वर्षापासून सुरु करणार CBSEच्या दहा शाळा – Sakal

मुंबई: मुंबई महानगर पालिका आगामी शैक्षणिक वर्षापासून केंद्रीय बोर्डाच्या (सीबीएसई )च्या दहा शाळा सुरु करणार आहे. सध्या जोगेश्‍वरी येथील सीबीएसई आणि वरळी येथे आयसीसई बोर्डाची प्रत्येकी प्रत्येकी एक शाळा सुरु केली आहे. यासाठी कंत्राटी पध्दतीने शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे.

जोगेश्‍वरी येथील महानगर पालिकेच्या सीबीएसई बोर्डाच्या शाळेला पालकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे महानगर पालिकेने दहा ठिकाणी या बोर्डाच्या शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. यात ज्युनियर केजी, सिनीयर केजी, पहिली ते सहावी पर्यंत प्रत्येक वर्गाची तुकडी सुरु करण्यात येणार आहे. तसेच आवश्‍यकता भासल्यास दहावी पर्यंतचे वर्गही आगामी वर्षापासून सुरु करता येणार आहे. तसा प्रस्ताव प्रशासनाने गुरुवारी होणाऱ्या शिक्षण समितीच्या पटलावर मांडला आहे. यासाठी कंत्राटी पद्धतीने शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. महापालिकेच्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या मोफत 27 शैक्षणिक साहित्यासह इतर सर्व सुविधा या विद्यार्थ्यांनाही मिळणार आहे.
 
भाषिक शाळांमधील 3152 शिक्षकांच्या जागा रिक्त

महानगर पालिकेच्या शाळांमध्ये 12 हजार 183 शिक्षकांच्या जागा असून त्यातील 4017 जागा रिक्त आहेत. त्यात इंग्रजी वगळता मराठी हिंदी, उर्दुसह इतर सर्व भाषिक शाळांमधील 3152 शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. अशी माहितीही प्रशासनाने या प्रस्तावात नमुद केली आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
 
महापौर, पालिका कर्मचाऱ्यांसाठी पाच टक्के कोटा

जोगेश्‍वरी येथील शाळेत प्रत्येक तुकडीत 40 विद्यार्थी आहेत. त्यात फक्त दोन जागा राखीव ठेवण्यात आले असून उर्वरीत 38 विद्यार्थ्यांचे प्रवेश ऑनलाईन पध्दतीने झाले. या नव्या शाळांमध्येही 40 विद्यार्थ्यांची तुकडी असण्याची शक्यता आहे. यातील 90 टक्के जागा या लॉटरी पद्धतीने भरल्या जाण्याची शक्यता आहे. पाच टक्के प्रवेश हे महापौरांच्या शिफारशीने आणि पाच टक्के जागा पालिका कर्मचाऱ्यांच्या मुलासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

हेही वाचा- मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी, मुंबईतील रक्ताचा तुटवडा दूर
 
या शाळांमध्ये केंद्रीय बोर्ड

दादर भवानी शंकर रोड मनपा शाळा, ॲन्टॉप हिल काणेनगर मनपा शाळा, प्रतिक्षा नगर मनपा शाळा, दिंडोशी मनपा शाळा, जनकल्याण नवीन इमारत मालाड, तुंगा व्हिलेज शाळा,विद्याविहार राजावाडी मनपा शाळा, चेंबूर अझीझ बाग मनपा शाळा, विक्रोळी हरियाली व्हिलेज मनपा शाळा,मुलूंड मिठागर शाळा 

—————————————-

(संपादन- पूजा विचारे)

Bombay Municipal Corporation will start ten CBSE schools from the next academic year

Source: https://www.esakal.com/mumbai/bombay-municipal-corporation-will-start-ten-cbse-schools-next-academic-year-399811