मुंबई बातम्या

आमची मुंबई बॅनरबाजीने विद्रुप – Lokmat

मुंबई : मुंबई महापालिकेने स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबईचा कितीही डंका वाजवू देत. मात्र मुंबई शहर आणि उपनगरात केल्या जात असलेल्या बॅनरबाजीने मुंबईचे विद्रुपीकरण होत आहे. यामध्ये राजकीय, व्यावसायिक, सामाजिक अशा बॅनर्स, बोर्डस आणि पोस्टर्सचा समावेश आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुंबई महापालिकेच्या खालोखाल मुंबईकरांना स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबईचा डोस देणा-या राजकारण्यांनी, त्यांच्या संबंधित कार्यकर्त्यांनी शुभेच्छा, नियुक्त्या असे अनेक आशायाचे बॅनर्स, पोस्टर्स, बोर्डस नाक्या नाक्यावर लावत मुंबई विद्रुप करण्याचा जणूकाही विडाच उचललयाचे चित्र आहे.

जानेवारी २०२० ते नोव्हेंबर २०२० या काळात मुंबई महापालिकेकडून बॅनरबाजीची आकडेवारी प्राप्त झाली असून, बॅनर्समध्ये सर्वाधिक बॅनर्स हे राजकीय आहेत. बोर्डचा विचार करता सर्वाधिक बोर्डसे हे सामाजिक आहेत. पोस्टर्सचा विचार करता सर्वाधिक पोस्टर्स हे सामाजिक आहेत. झेड्यांचा विचार करता अशा झेड्यांचा आकडा ७१८ आहे. अशा सगळ्या बॅनर्स, बोर्डस आणि पोस्टर्सचा आकडा ५ हजार ९४ असून, हा आकडा कारवाईचा आहे. म्हणजेच अद्याप असे अनेक बॅनर्स, बोर्डस आणि पोस्टर्स मुंबईत ठिकठिकाणी झळकत असून, त्यामुळे मुंबईच्या गलिच्छपणात भरच पडत आहे. दरम्यान, माहिती अधिकार कार्यकर्ते शरद यादव यांना माहिती अधिकारखाली अंतर्गत प्राप्त कागदपत्रांतून ही माहिती समोर आली आहे.

—————

दाद मागणार

आम्ही किंवा आमच्या पक्षाचे कार्यकर्ते सार्वजनिक ठिकाणी बॅनर्स लावणार नाहीत, असे प्रतिज्ञापत्र सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनीनी न्यायालयात दिले होते. तरी आजही राजकीय पक्षांचे बॅनर्स जागोजागी दिसतात. या संदर्भात मुंबई शहर व उपनगराचे विद्रुपिकरण करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याबाबत लवकरच न्यायालयात दाद मागणार आहे.

– शरद यादव, माहिती अधिकार कार्यकर्ता

—————

एकूण झालेली कारवाई
राजकीय : २ हजार ३३४
व्यावसायिक : ७००
सामाजिक : २ हजार ६०
एकूण : ५ हजार ९४

—————

एकूण खटले : १०१
पोलीस ठाण्यात तक्रारी : ७४५
एफ आय आर : ३७

—————
 

वाचकहो, ‘लोकमत’ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Our Mumbai banner scandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Source: https://m.lokmat.com/mumbai/our-mumbai-banner-scandal-a661/