मुंबई बातम्या

मुंबई मनपात डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय भरती सुरु, मुलाखतीसाठी लांबच लांब रांगा – TV9 Marathi

मुंबई : कोरोना विषाणूने मुंबईत थैमान घातलं आहे. त्याचाच सामना करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून वैद्यकीय कर्मचाऱ्यांची महाभरती सुरु करण्यात आली आहे (BMC Recruitment of Medical staff in Mumbai). या अंतर्गत महापालिकेत तात्पुरत्या स्वरुपात डॉक्टर्स, नर्स, वॉर्ड बॉय या पदांसाठी भरती होत आहे. या भरतीसाठी सध्या महापालिकेच्या विभागीय कार्यालयाबाहेर मुलाखतींसाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

मुंबई महापालिका कोरोनाचा सामना करण्यासाठी वैद्यकीय कर्मचाऱ्यांची संख्या वाढवत आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांचे विभागीय कार्यालयाच्या बाहेर ‘वॉक इन इंटरव्यूव्ह’ घेण्यात येत आहेत. त्यासाठी अनेकांनी लांबच लांब रांगा लावल्या आहेत. मुंबईत प्रत्येक विभागात प्रत्येकी 20 डॉक्टर्स, 50 स्टाफ नर्स, 50 शिपाई/वॉर्ड बॉय यांची भरती होणार आहे.

जी उत्तर विभाग कार्यालयाबाहेर भरतीसाठी लागलेल्या रांगा अगदी रुपारेल कॉलेजपर्यंत गेल्या आहेत. या ठिकाणी 50 शिपाई/वॉर्ड बॉय पदाच्या जागांसाठी 250 उमेदवार आले आहेत.

BMC Recruitment of Medical staff in Mumbai, मुंबई मनपात डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय भरती सुरु, मुलाखतीसाठी लांबच लांब रांगा

मुंबई महानगरपालिकेने संबंधित कर्मचाऱ्यांच्या कामाचा वेळ आणि त्यासाठी मिळणाऱ्या वेतनाचेही तपशील दिले आहेत.

BMC Recruitment of Medical staff in Mumbai, मुंबई मनपात डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय भरती सुरु, मुलाखतीसाठी लांबच लांब रांगा

कोरोना लढ्यासाठी पुणे महापालिकेत 178 डॉक्टरांची भरती

पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत (PMC Doctor Recruitment) आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेत डॉक्टरांची भरती करण्यात येणार आहे. पुणे आरोग्य विभागातील वर्ग एक आणि दोनच्या तब्बल 178 जागा भरण्याचा निर्णय पुणे महानगरपालिकेने घेतला आहे. पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी याबाबतची माहिती दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालिकेतील अत्यावश्यक सेवेतील रिक्त पदांपैकी 1 हजार 086 पदे भरण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार पुणे महापालिकेत डॉक्टरांची भरती केली जाणार आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागातील वर्ग एक आणि दोनच्या तब्बल 178 जागा भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या 15 दिवसात सरळ सेवा पद्धतीने ही पद भरली जाणार आहेत.

या भरतीमध्ये वर्ग एकच्या 121 जागा, तर वर्ग दोनच्या 57 पदांचा समावेश आहे. ही भरती गुणवत्तेवर आधारित होणार आहे. त्यासाठी शिक्षण, कामाचा अनुभव आणि सेवेची वर्षे यावर उमेदवाराची भरती अवलंबून असणार आहे. पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.

कोरोना रुग्णांची अद्ययावत आकडेवारी:

जिल्हा रुग्ण बरे मृत्यू
मुंबई 2085 30 122
पुणे (शहर+ग्रामीण) 467 19 46
पिंपरी चिंचवड 37 1
ठाणे (शहर+ग्रामीण) 125 3
नवी मुंबई 63 8 3
कल्याण डोंबिवली 68 2
उल्हासनगर 1
भिवंडी 1
मीरा भाईंदर 53 2
वसई विरार 61 1 3
पालघर 14 1
रायगड 8
पनवेल 28 1 1
नाशिक (शहर +ग्रामीण) 8
मालेगाव 45 2
अहमदनगर (शहर+ग्रामीण) 28 3 1
धुळे 1 1
जळगाव 2 1
सोलापूर 12 1
सातारा 7 2
कोल्हापूर 5 1
सांगली 26 4
सिंधुदुर्ग 1
रत्नागिरी 6 1
औरंगाबाद 28 5 2
जालना 2
हिंगोली 1
परभणी 1
लातूर 8
उस्मानाबाद 3 1
बीड 1
अकोला 14 1
अमरावती 5 1
यवतमाळ 13 3
बुलडाणा 21 1 1
वाशिम 1
नागपूर 57 5 1
गोंदिया 1
चंद्रपूर 2 1
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु) 11 2
एकूण 3320 331 201

संबंधित बातम्या :

लॉकडाऊन राहणारच, मात्र टप्प्याटप्प्याटप्याने अर्थव्यवस्थेला गती देणार : अजित पवार

भारतीय नौदलातही कोरोनाचा शिरकाव, मुंबईतील 20 सैनिकांना संसर्ग

पुण्यात 580 जणांना कोरोना संसर्ग, 47 जणांचा मृत्यू, हॉटस्पॉट ठरलेल्या भवानी पेठेसह कोठे किती रुग्ण?

संबंधित व्हिडीओ:

[embedded content]
BMC Recruitment of Medical staff in Mumbai

कमेंट करा

Source: https://www.tv9marathi.com/mumbai/recruitment-of-medical-staff-in-mumbai-by-bmc-amid-corona-virus-208699.html