मुंबई बातम्या

मुंबई-पुणे महामार्गावरील ब्रिटिशकालीन पूल स्फोटक लावून उडवला, क्षणात जमीनदोस्त होऊन इतिहासजमा – TV9 Marathi

पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील ब्रिटिशकालीन अमृतांजन ब्रिज स्फोटक लावून जमीनदोस्त करण्यात आला आहे (Demolition of Amrut Ranjan bridge on Mumbai Pune Express Way). स्फोटकांच्या स्फोटानंतर काही क्षणात हा पूल उद्ध्वस्त झाला आणि त्या जागेवर सर्वत्र केवळ धुरळा उडाला. त्यामुळे हा ब्रिटिशकालीन अमृतांजन पूल अखेर इतिहासजमा झाला आहे. सुरुवातीला पुलाच्या कमानी पाडण्यात आल्या. त्यानंतर संपूर्ण पूल जमीनदोस्त करण्यात आला.

या ब्रिटिशकालीन ब्रिज खालील द्रुतगती मार्गावर वळण आणि रुंद रस्ता असल्यानं या परिसरात अपघातांचं प्रमाण वाढलं होतं. हा भाग अपघात प्रवण क्षेत्रच बनल्यानं अखेर प्रशासनाने तो पाडण्याचा निर्णय घेतला. हा पूल पाडण्याचं आधीपासून नियोजन सुरु होतं, मात्र इतरवेळी वाहनांच्या गर्दीमुळे अडचण येत होती. अखेर लॉकडाऊनच्या काळाचा उपयोग करुन हा पूल जमीनदोस्त करण्यात आला. स्फोटानंतर मुंबई-पुणे महामार्गावर सर्वत्र मलबा आणि राडारोडा दिसत होता. यानंतर प्रशासनाने रस्त्यावरील मलबा हटवण्याचे काम सुरु केलं आहे. या पुलाचे उर्वरित अवशेष देखील पाडण्याचं काम सुरु आहे.

4 एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यानच्या काळात हा संपूर्ण पूल हटवण्याचं काम सुरु राहणार आहे. यासाठी यापुढेही स्फोटकांचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे या कालावधीत मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. पुणे लेनवरील वाहतूक अंडा पॉईंट येथून जुन्या मार्गावरून खंडाळा-लोणावळा शहरातून लोणावळा एक्झिट या द्रुतगती मार्गावर नेण्यात आली आहे. तर मुंबई लेनवरील वाहतूक लोणावळा एक्झिट येथून बाहेर पडून जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरुन लोणावळा-खंडाळा शहरातून अंडा पॉइंटपर्यंत वळवण्यात येणार आहे. म्हणजेच द्रुतगती मार्गावर एकूण 10 किलोमीटर अंतरासाठी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या :

औरंगाबादेत कोरोनाचा पहिला बळी, राज्यात कोरोनाबाधित मृतांची संख्या 36 वर

दिवे बंद होण्याच्या पार्श्वभूमीवर ऊर्जा मंत्र्यांची तातडीची बैठक, रात्री 9 च्या दरम्यान स्वतः लक्ष देणार

‘कोरोना’सोबत राज्यासमोर ‘हे’ प्रमुख आव्हान, उपमुख्यमंत्र्यांचं सुतोवाच, उपायही सुचवला

वर्ध्यात मजुरांची कामावरुन हकालपट्टी, कंपनीला 2 लाखांचा दंड

संबंधित व्हिडीओ:

[embedded content]

Demolition of Amrutanjan bridge on Mumbai Pune Express Way

कमेंट करा

Source: https://www.tv9marathi.com/pune/demolition-of-amrut-ranjan-bridge-on-mumbai-pune-express-way-by-blasting-203417.html