मुंबई बातम्या

मुंबई, ठाणे, नवी मुंबई गारठली ! मुंबईचा पारा 13 अंश सेल्सिअसवर, तापमानात आणखीन घट होण्याची शक्यता – Sakal

मुंबई : मुंबईत थंडीचा कडाका वाढलाय. मुंबईत आज किमान तापमान 13 अंश सेल्सिअस इतकं कमी नोंदवण्यात आलंय. काल मुंबईत 14 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तापमानात घट झाल्यामुळं मुंबईत रात्रीपासून गारठा अधिक जाणवू लागलाय. ठाणे, मुंबई, नवी मुंबईत तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. थंडीचा कडाका वाढल्यामुळं गरम कपडे घालून मुंबईकर वावरत असल्याचं चित्र सकाळच्या सुमारास दिसून आलं आहे.

दरम्यान, ठाणे, मुंबई, नवी मुंबईत उद्या 30 डिसेंबर रोजीही, सकाळी तापमानात तीव्र घट होण्याची शक्यता आहे. मुंबईत किमान तापमान 14 ते 15 अंशाच्या आसपास असून ते आणखी कमी होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.  ठाणे , नवी मुंबईत थंडी आणखीन वाढून पारा आणखीन खाली उतरण्याची शक्यता आहे. 

वाढत्या थंडीमुळे त्यामुळे पहाटे लवकर बाहेर पडणाऱ्यांची तसेच मॉर्निंग वाॅक करणाऱ्यांनी काळजी घेण्याची आवाहन मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने केले आहे. 

महत्त्वाच्या बातम्याही वाचा : 

>> पश्चिम रेल्वेप्रमाणेच IRCTC,MRVCकडून मराठी भाषेची गळचेपी

>> हृदयामुळे कित्येक वर्ष बसून झोपणाऱ्या 36 वर्षीय नायजेरीयन तरुणाला जीवदान

>> Corona Effect: कोविड 19 चा दुष्परिणाम, त्वचा दानात 90 टक्क्यांनी घट

>> New Year 2021: न्यू इअर पार्टीचे प्लानिंग करताय, मग ही काळजी घ्या ! 

mercury in mumbai thane navi mumbai dropped to 13 degree celsius cold wave in bombay

Source: https://www.esakal.com/mumbai/mercury-mumbai-thane-navi-mumbai-dropped-13-degree-celsius-cold-wave-bombay-391034