मुंबई बातम्या

मुंबई महाराष्ट्राच्या बापाची, सामनातून भाजप आणि कंगनावर टीका – Zee २४ तास

मुंबई : शिवसेनेचे मुखपत्र सामना मधून पुन्हा एकदा अभिनेत्री कंगना आणि भाजपवर टीका करण्यात आली आहे. मुंबईला पाकिस्तान म्हणणाऱ्या नटीमागे कोण? असा प्रश्न सामनातून उपस्थित करण्यात आला आहे.  ‘मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा पद्धतशीर प्रयत्न सुरू आहे. मुंबईची सतत बदनामी हा त्या कारस्थानाचाच एक भाग आहे. मुंबईस पाकिस्तान म्हणणारी एक नटी, मुख्यमंत्र्यांना अरे-तुरे म्हणणारा एक वृत्तवाहिनीचा […]

मुंबई बातम्या

जगाची नाही, मुंबई महाराष्ट्राच्या बापाची; शिवसेनेने पुन्हा ठणकावले – Lokmat

ठळक मुद्दे जगाची नाही तर मुंबई महाराष्ट्राच्या बापाची मुंबईला पाकिस्तान आणि महानगरपालिकेला बाबर म्हणणाऱ्या मागे भाजपा उभा राहतो हे दुर्दैवच दिल्ली किंवा महाराष्ट्रात सरकार कुणाचेही असो. एखादी अज्ञात शक्ती मुंबईच्या विरोधात पद्धतशीरपणे कारस्थान करत असते मुंबई – सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून मुंबई पोलिसांवर करण्यात आलेली टीका आणि अभिनेत्री कंगना राणौतने मुंबईची केलेली पीओकेशी तुलना […]

मुंबई बातम्या

मुंबई इंडियन्सकडे आहे हा घातक गोलंदज; विकेटचे दोन तुकडे केले, व्हायरल video – Maharashtra Times

दुबई: आयपीएलमधील (ipl 2020) सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्स ( mumbai indians) संघाने चार वेळा विजेतेपद मिळवले आहे. आता या वर्षी देखील मुंबईचा संघ पाचवे विक्रमी विजेतेपद मिळवण्याच्या प्रयत्ना असेल. मुंबई संघाचा पहिला सामना स्पर्धेतील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात यशस्वी संघ चेन्नई सुपर किंग्ज यांच्या विरुद्ध होणार आहे. यासाठी मुंबईचा संघ जोरदार तयारी करत आहे. […]

मुंबई बातम्या

एनसीबीचे मुंबई, गोव्यात छापे; सात अमली पदार्थ विक्रेत्यांना अटक – Loksatta

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात अमली पदार्थविरोधी पथकाने(एनसीबी) मुंबईसह गोव्यात छापे घालून सात जणांना अटक केली. त्यांच्याकडून अमली पदार्थ आणि रोख रक्कम हस्तगत करण्यात आली. अटक केलेल्यांपैकी करमजीतसिंह आनंद (२३) मुंबईतील उच्चभ्रू व्यक्तींना अमली पदार्थ पुरवणारा प्रमुख विक्रेता असून त्याचा सुशांत प्रकरणाशी थेट संबंध असल्याचा दावा एनसीबीने केला. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि पथकाने […]

मुंबई बातम्या

मुंबई मेट्रो : नऊ महिन्यानंतरही उमेदवार नोकरीच्या प्रतीक्षेत – Lokmat

ठळक मुद्दे६० ते ७० टक्के मुला मुलींनी मागची नोकरी सोडलीआता उमेवारांचा इन्कम सोर्स बंदबहुतांशी उमेदवार राज्यातील असंख्य जिल्हयांतील मुंबई : मुंबईमेट्रो कॉर्पोरेशन लिमिटेडने सप्टेंबर २०१९ मध्ये विविध तांत्रिक पदांकरिता १ हजार ५३ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्या सर्व पदांची ऑनलाईन परिक्षा ही नोव्हेंबर महिन्यात घेण्यात आली. या परिक्षेचा निकाल डिसेंबर महिन्यात लागला. निकाल लागल्यानंतर […]

मुंबई बातम्या

मुंबई महानगरांतले मजूर सरकारी मदतीपासून वंचित – Lokmat

मुंबई : कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या बांधकाम मजूरांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात दोन हजार आणि दुस-या टप्प्यात तीन हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले. मात्र, ज्या मुंबई महानगरांमध्ये (कोकण विभाग) सर्वाधिक बांधकाम मजूर आहेत तिथेच मदत मिळालेल्या मजूरांची संख्या नगण्य आहे. राज्यातील सहा विभागामध्ये तब्बल ३९३ कोटींचे वाटप सरकारने ९ सप्टेंबरपर्यंत केले आहे मात्र, कोकण विभागातील हे […]

मुंबई बातम्या

मुंबईत ‘कोरोना’ पुन्हा डोके वर काढण्याची भीती | Mumbai Corona Doubling Rate decreases – TV9 Marathi

मुंबई : मुंबईत नियंत्रणात आलेल्या ‘कोरोना’ने पुन्हा डोके वर काढत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी पुन्हा घसरु लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. दहा दिवसात डबलिंग रेट 84 वरुन 58 दिवसांवर आला आहे. (Mumbai Corona Doubling Rate decreases) एकीकडे मुंबईत दररोज कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढ होत आहे, तर डबलिंग रेट किंवा रुग्णसंख्या […]

मुंबई बातम्या

ही तर वादमाफियांची पोटदुखी; ‘मुंबई’वरून शिवसेनेचा विरोधकांवर पुन्हा हल्ला – Maharashtra Times

मुंबई:मुंबई पाकव्याप्त कश्मीर आहे की नाही, हा वाद ज्यांनी निर्माण केला त्यांनाच तो लखलाभ ठरो. मुंबईच्या वाटेला वाद हे तसे पाचवीलाच पुजलेले आहेत. पण त्या सगळ्या वादमाफियांना भीक न घालता मुंबई महाराष्ट्राची राजधानी म्हणून मिरवत आहे, अशा शब्दांत शिवसेनेने पुन्हा एकदा मुंबईवर टीका करणाऱ्यांवर हल्ला चढवला आहे. संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या अग्निपरीक्षेतून तावून सुलाखून मुंबई महाराष्ट्राच्या […]

मुंबई बातम्या

ड्रग्ज प्रकरणात मुंबई पोलिसांकडून होऊ शकते कंगनाची चौकशी – Zee २४ तास

मुंबई : अभिनेत्री कंगना रणौतच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. एकीकडे कंगनाने शिवसेनेवर टीका करणं सुरु केलं आहे तर दुसरीकडे भाजप महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकारला सतत घेरण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, मुंबई पोलीस कंगनाच्या ड्रग्ज कनेक्शनबाबत चौकशी सुरू करणार आहेत. आज (शनिवार) पासून कंगनाविरोधात ड्रग्ज कनेक्शनच्या संदर्भात चौकशी सुरू होण्याची शक्यता आहे. मुंबई पोलिसांना शासकीय पत्र […]

मुंबई बातम्या

मुंबई इंडियन्सच्या खेळाडूचा नवा लूक आला समोर, फोटो झाले व्हायरल – Maharashtra Times

गेल्यावर्षी जेतेपद पटकावलेला मुंबई इंडियन्सचा संघ सध्याच्या घडीला जोरदार सराव करत आहे. या हंगामातही जेतेपद पटकावण्याचा त्यांचा मानस आहे. पण या नव्या हंगामालाठी मुंबई इंडियन्सच्या एका खेळाडूने एक खास लूक तयार केला आहे. या लूकचे फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. हे फोटो आता चांगलेच व्हायरल झालेले पाहायला मिळत आहेत. या हंगामासाठी मुंबई इंडियन्सने […]