मुंबई बातम्या

Mumbai Rape: मुंबई हादरली! वरळीत २० महिन्यांच्या चिमुकलीवर अत्याचार; शेजारी राहणाऱ्या आरोपीला अटक – Marathi Hindustan Times

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित मुलगी दोघेही एकाच परिसरात राहतात. पीडिताची आई काही काळासाठी घराबाहेर गेली होती. त्यावेळी आरोपीने तिला घरात एकटी पाहून स्वत:च्या घेऊन गेला. तिथेच त्याने पीडितावर अत्याचार केले. त्यानंतर त्याने पुन्हा मुलीला तिच्या घराबाहेर सोडलं. पण घरी आल्यानंतर मुलगी खूप रडत होती. पीडिताच्या आईला वेळगाच संशय आल्याने ती मुलीला घेऊन जवळच्या रुग्णालयात गेली. त्यानंतर डॉक्टरांनी तिची तपासणी केली असता तिच्यावर अत्याचार झाल्याचे उघडकीस आले. मुलीच्या आईनं तात्काळ पोलीस स्थानक गाठलं आणि आरोपींविरोधात तक्रार दाखल केली.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMilgFodHRwczovL21hcmF0aGkuaGluZHVzdGFudGltZXMuY29tL21haGFyYXNodHJhL211bWJhaS1yYXBlLWEtMjAtbW9udGgtb2xkLWJhYnktZ2lybC13YXMtYWxsZWdlZGx5LXJhcGVkLWJ5LWhlci1uZWlnaGJvdXItaW4td29ybGktMTQxNjc0NDcyNTYwMDQ5Lmh0bWzSAZoBaHR0cHM6Ly9tYXJhdGhpLmhpbmR1c3RhbnRpbWVzLmNvbS9hbXAvbWFoYXJhc2h0cmEvbXVtYmFpLXJhcGUtYS0yMC1tb250aC1vbGQtYmFieS1naXJsLXdhcy1hbGxlZ2VkbHktcmFwZWQtYnktaGVyLW5laWdoYm91ci1pbi13b3JsaS0xNDE2NzQ0NzI1NjAwNDkuaHRtbA?oc=5