मुंबई बातम्या

उद्धव ठाकरे: ‘तुमच्यासाठी मुंबई सोन्याचं अंडं देणार कोंबडी, आमच्यासाठी मातृभूमी’ – BBC

फोटो स्रोत, FACEBOOK

“तुम्ही मुंबईला सोन्याचं अंडं देणार कोंबडी म्हणून बघतायेत. पण आम्ही ती आमची मातृभूमी म्हणून बघतोय”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“मोदी असले तरीही महाराष्ट्रात बाळासाहेबांशिवाय मत मिळू शकत नाही. तुम्ही मोदींचे फोटो लावून या, आम्ही बाळासाहेबांचे फोटो लावून येतो”, असं उद्धव ठाकरे म्हणाले. बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती निमित्ताने षष्णमुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

मुंबई महानगर पालिकेच्या बॅंकेतील ठेवींकडे या लोकांचा डोळा आहे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधला.

“दुसऱ्यांचे वडील चोरता चोरता स्वतचे वडील कोण ते लक्षात ठेवा. बाळासाहेबांचं तैलचित्र लावताय- आनंद आहे. पण तुमचा हेतू वाईट आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“ज्यांनी तैलचित्र चितारलं आहे, त्यांना वेळ दिला का? एकीकडे म्हणतात बाळासाहेबांचे वारसदार, एकीकडे मोदींची माणसं, एकीकडे शरद पवारांना गोड माणूस म्हणतात- नक्की कोणाचे आहात. महाविकास आघाडी सरकार का मोडलं- तर हिंदुत्वाची कास सोडली म्हणे. काल म्हणतात शरद पवारांचं मार्गदर्शन घेतो. मग मी काय घेत होतो”?

उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, शिवसेना

फोटो स्रोत, UDDHAV THACKERAY

“खोक्यांनी गद्दार विकत घेतले जाऊ शकतात पण हे जे आहे ते विकत घेतलं जाऊ शकत नाही. मला अमेरिकेचे अध्यक्ष भेटले. काळजीत दिसले. ते म्हणाले उद्या मी भाजपमध्ये चाललोय. राष्ट्राध्यक्षांच्या घरावर एपीआयने धाड टाकली. खोकेवीर यांनी सांगितलं, तू कसा जगणार. भाजपमध्ये ये. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मिंधे गटात गेले.
ज्यांना जिकडे जायचंय, झोपेसाठी जायचंय त्यांनी तिकडेच झोपावं. उठूच नका”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

त्यांनी पुढे सांगितलं, “प्रकाश आंबेडकर आपल्यासोबत आलेत. दोन नातू एकत्र आलेत. जे डोक्यावर बसतात त्यांना जा तू असं म्हणू. हिंदुत्वाच्या आडून देशावर पोलादी पकड बसवायची असा प्रकार सुरु आहे. काही वर्षांपूर्वी मी चीनला गेलेलो. दुभाष्याशिवाय चालत नाही. बीजिंगमध्ये ऑलिम्पिक होतं. एक दुभाषा होता. बीजिंगमध्ये अनवधानाने सरकारविरोधात बोललं तर दोन दिवसात गायब होते. मला जगायचं आहे. अशी पकड आपल्याकडेही आहे.”

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी दूर व्हायची इच्छा व्यक्त केलीये. फार उशीरा शहाणपण सुचलं. महाराष्ट्रद्वेष्टी माणूस… यापुढे सोडायचं नाही असं ठाकरे म्हणाले.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.’सोपी गोष्ट’ आणि ‘3 गोष्टी’ हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMiMWh0dHBzOi8vd3d3LmJiYy5jb20vbWFyYXRoaS9hcnRpY2xlcy9jZzN3a2pudjQzcm_SATVodHRwczovL3d3dy5iYmMuY29tL21hcmF0aGkvYXJ0aWNsZXMvY2czd2tqbnY0M3JvLmFtcA?oc=5