मुंबई बातम्या

Weather Alert : मुंबई, पुण्यासह राज्यातून थंडी जाणार, पुढच्या ५ दिवसांत ‘या’ भागांत पावसाचा इशारा – Maharashtra Times

मुंबई : राज्यसह देशात गेल्या काही दिवसांमध्ये थंडीचा तडाका पाहायला मिळाला. महाराष्ट्रातल्या बहुतांश भागांमध्ये थंडीचा जोर होता. थंडीपासून वाचण्यासाठी अनेक ठिकाणी शेकोट्या पेटलेल्याही पाहायला मिळाल्या. पण आता हुडहुडी भरवणाऱ्या थंडीपासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे. कारण, पुढच्या पाच दिवसांमध्ये हा जोर कमी होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्याचे लोट कमी होणार असल्यामुळे राज्यातील तापमान देखील २ ते ३ अंशांनी घसरेल अशी माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. हवामानाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा थंडीचा कालावधी कमी असल्याची माहिती आहे. पण तरीदेखील मुंबई, कोकण, खानदेश, नाशिक, पुणे, सातारा, औरंगाबाद आणि नगर या जिल्ह्यांमध्ये कडाक्याची थंडी पडल्याचं पाहायला मिळालं. ही थंडी कमी होण्यासाठी आणखी ५ दिवसांचा कालावधी लागणारे आहे.

३ वर्ष नोकरीचा संघर्ष, अखेर मिळालं यश; ‘या’ तरुणीने चालवली थेट PM मोदींनी प्रवास केलेली मेट्रो
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर भारतीयांसाठी देखील ही एक दिलासादायक बातमी आहे. कारण, पुढचे ५ दिवस उत्तर भारतात थंडीपासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे. पण याच दरम्यान अनेक भागांमध्ये पाऊस पडणार असल्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २१ जानेवारीपर्यंत हवामान कोरडे असेल मात्र २२ जानेवारीनंतर हवामानात बदल झाल्याचा पाहायला मिळेल.

२३ जानेवारी ते २५ जानेवारी या दरम्यान देशाच्या विविध भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांचाही समावेश आहे. तसेच इतकंच नाहीतर जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंदिगड, दिल्ली, उत्तराखंड या राज्यांमध्येही हवामान खात्याकडून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

‘हम याद बहुत आएंगे’, रेडिओवर दुखद गाणी ऐकत असताना २२ वर्षीय तरुणीने संपवलं जीवन

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMimQFodHRwczovL21haGFyYXNodHJhdGltZXMuY29tL21haGFyYXNodHJhL211bWJhaS1uZXdzL2ltZC13ZWF0aGVyLWFsZXJ0LWNvbGQtd2F2ZS13aWxsLXJlZHVjZS1pbi1tYWhhcmFzaHRyYS1yYWluLWZvcmVjYXN0LXVwZGF0ZS9hcnRpY2xlc2hvdy85NzE2NzQ2Ni5jbXPSAZ0BaHR0cHM6Ly9tYWhhcmFzaHRyYXRpbWVzLmNvbS9tYWhhcmFzaHRyYS9tdW1iYWktbmV3cy9pbWQtd2VhdGhlci1hbGVydC1jb2xkLXdhdmUtd2lsbC1yZWR1Y2UtaW4tbWFoYXJhc2h0cmEtcmFpbi1mb3JlY2FzdC11cGRhdGUvYW1wX2FydGljbGVzaG93Lzk3MTY3NDY2LmNtcw?oc=5