मुंबई बातम्या

Priyanka Chopra: प्रियांका चोप्राने माजी मॅनेजरविरोधात केलेली ‘ती’ तक्रार न्यायालयाकडून रद्द;देसी गर्लसोबत … – News18 लोकमत

मुंबई, 20 जानेवारी- बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या हॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. अभिनेत्री विविध हॉलिवूड सीरिजमधून आपल्या अभिनयाचा जलवा दाखवत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रियांका बॉलिवूड चित्रपटांमध्ये झळकलेली नाहीय. त्याचे चाहते तिला प्रचंड मिस करत आहेत. प्रियांका सध्या बॉलिवूडपासून दूर असली तरी चाहते तिच्या प्रत्येक गोष्टींवर लक्ष ठेवून असतात. तसेच अभिनेत्रीबाबत जाणून घेण्यास नेहमीच उत्सुक असतात. दरम्यान प्रियांका चोप्रा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. पाहूया नेमकं काय घडलंय.

बॉलिवूड अभिनेत्री सध्या एका खाजगी प्रकरणामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने आपला माजी मॅनेजर प्रकाश जाजू यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली होती. हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात होतं. दरम्यान समोर आलेल्या नव्या माहितीनुसार, मुंबई उच्च न्यायालयाने प्रियांका चोप्राने आपल्या माजी मॅनेजर प्रकाश जाजूविरोधात केलेली फिर्याद कोर्टाने रद्द केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार प्रियांका चोप्रा आणि माजी मॅनेजर प्रकाश जाजूने आपसी सामंजस्याने हा प्रकार सोडवल्याने ही फिर्याद कोर्टाने रद्द केल्याचं सांगितलं जात आहे.

(हे वाचा: Priyanka Chopra: ब्रिटिश वोगच्या कव्हरवर झळकणारी पहिली भारतीय ठरली प्रियांका चोप्रा; मुलीसोबत केलं झक्कास फोटोशूट)

काय आहे नेमकं प्रकरण?

बॉलिवूड-हॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने आपला माजी मॅनेजर प्रकाश जाजू विरोधात पोलिसांत एफआयआर दाखल केली होती. प्रियांका चोप्राच्या मते प्रकाश जाजूने 2008 मध्ये अभिनेत्रीला आक्षेपार्ह मॅसेज पाठवून आपल्याला धमकी दिल्याचा आरोप केला होता. त्यांनतर हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात पोहोचलं होतं.

प्रियांका चोप्रा आणि प्रकाश जाजू या दोन्ही पक्षांनी हे प्रकरण सामंजस्याने आपापसांत सोडवल्याची खात्री कोर्टात करुन देण्यात आली त्यांनतर मुंबई उच्च न्यायालयाने हे प्रकरण रद्द केलं आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज के चव्हाण यांच्या खंडपीठांसमोर अभिनेत्री प्रियंका चोप्राच्या वतीनं संमती देणारं प्रतिज्ञापत्र तिच्या वकिलांनी सादर केलं. चोप्राने तिच्या प्रतिज्ञापत्रात सांगितले की जाजूने हे प्रकरण मिटवण्यासाठी तिच्याशी संपर्क साधला होता.

सविस्तर चर्चा केल्यानंतर आणि जाजूने बिनशर्त माफी मागितल्यानंतर तिने या समस्येचे निराकरण करण्याचा निर्णय घेतला.जाजूने बिनशर्त माफी मागत प्रियांका चोप्रा यांना दुखावण्याचा किंवा धमकावण्याचा त्यांचा कोणताही हेतू नव्हता असे म्हटले आहे. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने प्रकाश जाजूविरोधात असलेला गुन्हेगारी धमकी आणि महिलेच्या विनयशीलतेचा अपमान हा 2008 मधील खटला रद्द केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMihwFodHRwczovL2xva21hdC5uZXdzMTguY29tL2VudGVydGFpbm1lbnQvcHJpeWFua2EtY2hvcHJhLWNvbXBsYWludC1hZ2FpbnN0LWZvcm1lci1tYW5hZ2VyLWNhbmNlbGVkLWJ5LW11bWJhaS1oaWdoLWNvdXJ0LW1oYWQtODE3MzU1Lmh0bWzSAYsBaHR0cHM6Ly9sb2ttYXQubmV3czE4LmNvbS9hbXAvZW50ZXJ0YWlubWVudC9wcml5YW5rYS1jaG9wcmEtY29tcGxhaW50LWFnYWluc3QtZm9ybWVyLW1hbmFnZXItY2FuY2VsZWQtYnktbXVtYmFpLWhpZ2gtY291cnQtbWhhZC04MTczNTUuaHRtbA?oc=5