मुंबई बातम्या

मेट्रोसह ‘मुंबई वन’ची सुरुवात, मेट्रोचे ऑनलाईन तिकीट काढण्यासाठी विशेष ॲप – Maharashtra Times

मुंबई : मेट्रोच्या दोन मार्गिकांच्या लोकार्पणाद्वारे ‘मुंबई वन’ (Mumbai 1) हे विशेष ॲप पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे. मेट्रो तिकीट ऑनलाइन काढण्यासाठीचे हे विशेष ॲप आहे. यासह मेट्रो तिकीट काढण्यासाठी राष्ट्रीय समान वाहतूक कार्डदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी सादर करणार आहेत.

मेट्रो २ अ आणि ७ चे तिकीट काढण्यासाठी ‘मुंबई वन’ हे ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. हे ॲप या लोकार्पणाद्वारे अधिक सक्षम केले जाणार आहे. एकप्रकारे ॲपचेदेखील लोकार्पण मेट्रो मार्गिकेसह होणार आहे. या ॲपवर मेट्रो २ अ आणि ७ च्या अंधेरी पश्चिम ते गुंदवली (दहिसरमार्गे) दरम्यानच्या सर्व स्थानकांचे तिकीट प्रवास सुरू करण्याआधीच काढता येणार आहे. याद्वारे क्यूआर कोड तयार होतो व तो दाखवून मेट्रोमध्ये चढता येईल.

तांबे, पटोले आणि देशमुखांचे पत्र, काँग्रेसमध्ये घडतंय तरी काय?, महिलांसाठी LIC ची भन्नाट पॉलिसी; वाचा टॉप १० न्यूज
याप्रमाणेच ‘राष्ट्रीय समान वाहतूक कार्ड'(एनसीएमसी) हेदेखील मुंबईतील मेट्रो सेवेसाठी सुरू होणार आहे. हे कार्ड ‘रुपे’ अंतर्गत बँकेकडून खरेदी करता येईल. कार्ड रिचार्ज करून त्याआधारे ऑनलाइन तिकीट काढता येते. तसेच या कार्डचा उपयोग ऑफलाइन तिकीटासह विविध ठिकाणी करता येतो. मेट्रो मार्गिकांच्या लोकार्पणासह हे कार्डदेखील मुंबईकर प्रवाशांसाठी २० जानेवारीपासून उपयोगात येणार आहे.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMimQFodHRwczovL21haGFyYXNodHJhdGltZXMuY29tL21haGFyYXNodHJhL211bWJhaS1uZXdzL211bWJhaS1vbmUtbGF1bmNoLW9mLXdpdGgtbWV0cm8tYS1zcGVjaWFsLWFwcC1mb3Itb25saW5lLXRpY2tldGluZy1vZi1tZXRyby9hcnRpY2xlc2hvdy85NzA3NDAzNy5jbXPSAZ0BaHR0cHM6Ly9tYWhhcmFzaHRyYXRpbWVzLmNvbS9tYWhhcmFzaHRyYS9tdW1iYWktbmV3cy9tdW1iYWktb25lLWxhdW5jaC1vZi13aXRoLW1ldHJvLWEtc3BlY2lhbC1hcHAtZm9yLW9ubGluZS10aWNrZXRpbmctb2YtbWV0cm8vYW1wX2FydGljbGVzaG93Lzk3MDc0MDM3LmNtcw?oc=5