मुंबई बातम्या

nmmc to make decision on park timings in navi mumbai city zws 70 – Loksatta

संतोष जाधव ,लोकसत्ता

नवी मुंबई महापालिकेत उत्तम दर्जाची विरंगुळ्याची ठिकाणे अर्थात उद्यान निर्मितीकडेही विशेष लक्ष दिले जात असून  शहरातील १०८ चौ.कि.मी.च्या महापालिका क्षेत्रात जवळजवळ १७० पेक्षा अधिक उद्याने,  तसेच १०० पेक्षा अधिक सुशोभित जागा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

शहरातील वंडर्सपार्क, रॉक गार्डन, सेंट्रल पार्क, झेन गार्डन,संवेदना गार्डन अशी विविध आकर्षक उद्याने असणाऱ्या नवी मुंबई शहरात या उद्यानांच्या वेळाबाबत नागरीकांमध्ये प्रतंड नाराजी असून शहरातील उद्याने नागरीकांसाठी व मुलांना खेळण्यासाठी आहेत की फक्त शहराची शोभा वाढवण्यासाठी असा प्रश्न जाऊ लागला आहे.

हेही वाचा >>> नवी मुंबई : एपीएमसीत संचालक मंडळ पूर्ण नसल्याने नवीन विकासकामांचा खोळंबा

नवी मुंबई शहरात बेलापूर ते दिघा परिसरात अनेक आकर्षक व देखणी उद्याने आहेत अनेक उद्याने प्रशस्त आहेत. नेरुळ ,बेलापूर विभागात  शहरातील सर्वात जास्त व मोठी उद्याने आहेत. शहरातील मिनी शिशोर म्हणून प्रसिध्द असलेल्या वाशी सेक्टर १० येथील परिसरातही अनेक उद्याने आहेत. परंतू या उद्यांनांच्या वेळाबाबत नागरीकांमध्ये नाराजी पसरली आहे, करोनाकाळात टाळेबंदीमुळे उद्याने कुलुपबंद होती. त्यानंतर करोनाच्या काळात रुग्णसंख्येनुसार शासनानेही अनेकवेळा करोनाची स्थिती पाहून निर्णय घेतले. करोनाचा प्रदुर्भाव कमी झाल्यानंतर पालिकेने सुरवातील फक्त सकाळीच ठराविक वेळात उद्याने उघडण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे पहाटे ५ ते ९ वाजेपर्यतं  उद्याने उघडी ठेवण्यात येत होती.त्यानंतर ही उद्याने सकाळी व संध्याकाळी अशा दोन वेळात  खुली ठेवण्याची परवानगी देण्यात आलीय त्याप्रमाणे सध्या शहरात ५ ते १० व सायंकाळी ५ ते ९ ही उद्यानाची वेळ निश्चित करण्यात आली आहे. परंतू शहरातील सर्वच उद्यानात सकाळी जॉगिगं करणाऱ्या व्यतिरिक्त इतर नागरीक  जात नाहीत. तर चालण्यासाठी जाणारे नागरीक ज्येष्ठ नागरीक सकाळी ८ ते ९ पर्यंत उद्यानात जाताच उद्यान बंद करण्याची वेळ होते. त्यामुळे नागरीकांनी उद्यानाच्या वेळा वाढवण्याची मागणी पालिका आयुक्त तसेच उद्यान उपायुक्त यांच्याकडे केली आहे,

हेही वाचा >>> नवी मुंबई :पगारवाढ केला नाही म्हणून गोपनीय माहिती असलेल्या लॅपटॉपची चोरी

वाशी सेक्टर १० परिसरात असलेली अनेक उद्याने तसेच शहरातील इतर भागात असणारी उद्यानेही सायंकाळी ८ वाजताच बंद करत असल्याच्या तक्रारी येत असून उद्याने ही नागरीकांसाठी आहेत. ती कुलुपबंद कशासाठी असा प्रश्न नागरीक विचारत आहेत.

शहरातील उद्याने ही छान व मोठी व देखणी आहेत. परंतू उद्यानांचा उपयोग नागरीकांसाठी झाला पाहीजे. उद्यानांच्या वेळा वाढवून देणे आवश्यक आहे. उद्याने बंद करण्याची वेळ सायंकाळी ९ असताना उद्याने ही  ८ वाजताच बंद केली जातात .उद्यांनाच्या वेळा वाढवून देणे आवश्यक आहे.

दिलीप तरडे, नागरीक वाशी 

नवी मुंबईतील उद्यानांच्या वेळाबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय घेतला जाणार आहे. नागरीकांकडून उद्यानांच्या वेळा वाढवून देण्याबाबत मागणी करण्यात येत आहे. याबाबत आयुक्तांकडे प्रस्ताव असून लवकरच धोरणात्मक निर्णय उद्यानांच्या वेळाबाबत घेतला जाणार आहे.

नितीन नार्वेकर, उपायुक्त उद्यान विभाग

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMibWh0dHBzOi8vd3d3Lmxva3NhdHRhLmNvbS9uYXZpbXVtYmFpL25tbWMtdG8tbWFrZS1kZWNpc2lvbi1vbi1wYXJrLXRpbWluZ3MtaW4tbmF2aS1tdW1iYWktY2l0eS16d3MtNzAtMzQwNTEzMi_SAQA?oc=5