मुंबई बातम्या

वाद संपेना! मुंबई पोलीस शिपायाने महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील पंचांना दिली धमकी – News18 लोकमत

मुंबई, 16 जानेवारी : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सिकंदर शेख विरुद्ध महेंद्र गायकवाड यांच्या कुस्तीवेळी पंच असलेल्या मारूती सातव यांना फोनवरून धमकी देण्यात  धक्कादायक माहिती समोर आली आहे. सिकंदर शेख विरुद्ध महेंद्र गायकवाडला चार पॉइंट दिल्याने सध्या वाद निर्माण झाला आहे. यामध्ये आपल्या मुलावर अन्याय झाल्याची भावना सिकंदरच्या वडिलांनी व्यक्त केलीय.

महाराष्ट्र केसरीत मातीच्या अंतिम फेरीत सिकंदरविरोधात चार गुण दिल्याने पंच मारूती सातव यांना मुंबई पोलिस दलातील शिपाई संग्राम कांबळे याने फोन वरून दिली धमकी. सातव यांचा केसरी स्पर्धा अध्यक्षांकडे तक्रार अर्ज केली असून आता कोथरूड पोलिसांकडे करणार तक्रार आहेत.

हेही वाचा : आज ना उद्या महाराष्ट्र केसरी होऊन दाखवेन; पंचांच्या निर्णयावर काय म्हणाला सिकंदर?

पंच मारुती सातव यांनी स्पर्धा अध्यक्षांकडे तक्रार केली आहे. त्यानंतर आता कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात येणार आहे. पंचांना धमकी देण्यापर्यंत हा प्रकार पोहोचला आहे. पंचांनी काम कसं करायचं असा प्रश्न मारुती सातव यांनी विचारला. २० वर्षांपासून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धात पंच म्हणून काम पाहिलं. खालची टांग हा डाव महेंद्रने सिकंदरवर लावला होता आणि सिकंदरसुद्धा डेंजर झोनमध्ये गेला होता असं मारुती सातव यांनी म्हटलंय.

तुमच्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून शपथ वाहा की मी दिलेला निर्णय खोटा आहे असं फोनवरून बोलणाऱ्या व्यक्तीने म्हटलं. धमकीच्या फोनबाबत सांगताना मारुती सातव म्हणाले की, मला वाटत नाही की मी कुणावर अन्याय केला. मी अन्याय करण्यासाठी नाही तर न्याय करण्यासाठी उभा. असे फोन येत राहतील आणि अशा फोनला का बळी पडायचं असं मारुती सातव यांनी म्हटलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMikAFodHRwczovL2xva21hdC5uZXdzMTguY29tL3Nwb3J0L21haGFyYXNodHJhLWtlc2FyaS1zaWthbmRhci1zaGFpa2gtbWF0aGNoLXJlZnJlZS1yZWNpZXZlLXRocmVhdC1jYWxsLWJ5LW11bWJhaS1wb2xpY2UtY29uc3RhYmxlLW1oc3ktODE1MjM3Lmh0bWzSAZQBaHR0cHM6Ly9sb2ttYXQubmV3czE4LmNvbS9hbXAvc3BvcnQvbWFoYXJhc2h0cmEta2VzYXJpLXNpa2FuZGFyLXNoYWlraC1tYXRoY2gtcmVmcmVlLXJlY2lldmUtdGhyZWF0LWNhbGwtYnktbXVtYmFpLXBvbGljZS1jb25zdGFibGUtbWhzeS04MTUyMzcuaHRtbA?oc=5