मुंबई बातम्या

Mumbai News : मुंबईत 1993 सारखे बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी – Zee २४ तास

Breaking news Mumbai Bomb Blast ATS Threat : मुंबईकरांसाठी मोठी बातमी… मुंबईत 1993 सारखे बॉम्ब ब्लास्ट घडवण्याची धमकी देण्यात आलीय. मुंबई पोलीस कंट्रोल रुमला यासंबंधी एक धमकीचा फोन आला होता. मुंबईत माहिम, भेंडी बाजार, नागपाडा, मदनपुरा परिसरात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी या कॉलद्वारे देण्यात आली. याप्रकरणी एका संशयित व्यक्तीला मुंबई एटीएसनं ताब्यात घेतलं आहे. (Mumbai news Bomb Blast ATS Threat call Bomb blast threat like 1993 in Mumbai marathi news)

दिल्लीत हल्ल्याचा कट

दरम्यान भारताची राजधानी नवी दिल्लीमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. 26 जानेवारीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत हल्ल्याचा कट रचला गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कमी वयाच्या मुलांकडून हा हल्ला होण्याची शक्यता वर्तविण्यात येतं आहे. गुप्तहेर संस्थेला यासंदर्भात दिल्ली पोलिसांनी माहिती दिली असून पोलीस प्रशासन सतर्क झाले आहेत. 

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMiiQFodHRwczovL3plZW5ld3MuaW5kaWEuY29tL21hcmF0aGkvbXVtYmFpL211bWJhaS1uZXdzLWJvbWItYmxhc3QtYXRzLXRocmVhdC1jYWxsLWJvbWItYmxhc3QtdGhyZWF0LWxpa2UtMTk5My1pbi1tdW1iYWktbWFyYXRoaS1uZXdzLzY4MTM1MtIBjQFodHRwczovL3plZW5ld3MuaW5kaWEuY29tL21hcmF0aGkvbXVtYmFpL211bWJhaS1uZXdzLWJvbWItYmxhc3QtYXRzLXRocmVhdC1jYWxsLWJvbWItYmxhc3QtdGhyZWF0LWxpa2UtMTk5My1pbi1tdW1iYWktbWFyYXRoaS1uZXdzLzY4MTM1Mi9hbXA?oc=5