मुंबई बातम्या

Breaking News: मुंबईत १९९३ प्रमाणे साखळी बॉम्बस्फोट होतील, पोलिसांच्या कंट्रोल रुममध्ये फोन… – Maharashtra Times

मुंबई: मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात फोन करून १९९३ प्रमाणे साखळी बॉम्बस्फोटाची धमकी देणाऱ्याला दहशतवाद विरोधी पथक (एटीएस)ने मालाड येथून अटक केली. नबी याहया खान उर्फ के.जी.एन. लाला, वय ५५ असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो मालाडच्या पठाणवाडीचा राहणारा आहे.

मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात शनिवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास फोन आला. १९९३ जसा बॉम्बस्फोट झाला त्याप्रमाणे दोन महिन्यानंतर मुंबईमध्ये माहिम, भेंडीबाजार, नागपाडा, मदनपुरा याठिकाणी होणार आहे. तसेच मुंबई मध्ये १९९३ सालासारख्या दंगली होणार आहेत. यासाठी बाहेरच्या राज्यातून लोकांना बॉम्ब ब्लास्ट आणि दंगली करण्यासाठी बोलविले आहे, असे सांगण्यात आलं. याबाबत मुंबई पोलिसांनी एटीएसला माहिती दिल्यानंतर दोन पथके तयार करण्यात आली. जूहू युनिटच्या पथकाने नबी याहया खान उर्फ के.जी.एन. लाला यास मालाड रेल्वे स्थानक परिसरातून शोधून काढले.

लाला याच्या विरूध्द मुंबई मध्ये जबरी चोरी, विनयभंग व अतिक्रमण असे १२ गुन्हे दाखल असून सन २०२१ मध्ये त्याला मालाड पोलीस ठाणे मार्फत तडीपार करण्यात आले होते. एटीएसच्या पथकाने त्याला आझाद मैदान पोलिसांच्या ताब्यात दिले असून त्याने हा फोन कशासाठी केला याबाबत चौकशी सुरू आहे.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMiswFodHRwczovL21haGFyYXNodHJhdGltZXMuY29tL21haGFyYXNodHJhL211bWJhaS1uZXdzL2JpZy1icmVha2luZy1ib21iLWJsYXN0LWxpa2UtMTk5My13aWxsLWhhcHBlbi1pbi1tdW1iYWktYWdhaW4tdGhyZWF0LWNhbGwtdG8tbXVtYmFpLXBvbGljZS1hcnJlc3Qtb25lL2FydGljbGVzaG93Lzk2ODMwNDI0LmNtc9IBtwFodHRwczovL21haGFyYXNodHJhdGltZXMuY29tL21haGFyYXNodHJhL211bWJhaS1uZXdzL2JpZy1icmVha2luZy1ib21iLWJsYXN0LWxpa2UtMTk5My13aWxsLWhhcHBlbi1pbi1tdW1iYWktYWdhaW4tdGhyZWF0LWNhbGwtdG8tbXVtYmFpLXBvbGljZS1hcnJlc3Qtb25lL2FtcF9hcnRpY2xlc2hvdy85NjgzMDQyNC5jbXM?oc=5