मुंबई बातम्या

Big Breaking : मुंबईत 1993 सारखा बॉम्बस्फोट होईल, पोलीस कंट्रोलला फोन – ABP Majha

Big Breaking : मुंबई (Mumbai News) पुन्हा एकदा बॉम्बनं उडवून (Bomb Blast) देण्याची धमकी देणारा फोन मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) कंट्रोल रूममध्ये पुन्हा एकदा खणाणला आहे. पुढच्या दोनच महिन्यांत मुंबईत 1993 सारखे स्फोट होणार, अशी धमकी देणारा फोन मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला आला आहे. तसेच, मुंबईतील गजबजलेली ठिकाणं म्हणजेच, माहीम (Mahim), भेंडी बाजार (Bhendi Bazar), नागपाडामध्ये (Nagpada) बॉम्बस्फोट होण्याचा दावा या फोनवर करण्यात आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, बॉम्बस्फोट घडवण्यामागे एका काँग्रेस आमदाराचा हात असल्याचंही या फोनवर सांगण्यात आलं आहे. दरम्यान, मुंबई एटीएसनं हा फोन ज्या व्यक्तीनं केलाय त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी सखोल चौकशी सुरू आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूममध्ये कालच (शनिवारी) फोन केला होता. फोन करणाऱ्यानं पुढच्या दोन महिन्यांतच मुंबईत 1993 सारखे स्फोट होणार असल्याचा दावा केला. मुंबईच्या माहिम, भेंडीबाजार, मदनपुरा आणि नागपाडामध्ये बॉम्बस्फोट होणार असून यामागे एका काँग्रेस आमदाराचा हात असल्याचंही धमकी देणाऱ्यानं सांगितलं होतं. त्याचप्रमाणे 1993 साली मुंबईत दंगल उसळली होती. तशीच दंगल आताही होणार असल्याचंही या फोनवरुन सांगण्यात आलं होतं.

एवढंच नाहीतर काही वर्षांपूर्वी देशाला दादरवणारी घटना दिल्लीत घडली होती. ती घटना म्हणजे, निर्भया प्रकरण. असीच घटना पुढच्या दोन महिन्यांत मुंबईतही होणार असल्याचंही या फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीनं सांगितलं होतं. मुंबईत बॉम्बस्फोट, दंगली घडवण्यासाठी दुसऱ्या राज्यातून लोक आली असून यामागे एका काँग्रेसच्या आमदाराचा हात असल्याचंही फोनवरुन बोलणाऱ्या व्यक्तीनं म्हटलं होतं. 

मुंबई एटीएस (Mumbai ATS), मुंबई क्राईम ब्रांच (Mumbai Crime Branch) आणि सीआययूची टीम आरोपीच्या मागे लागली होती. फोन करणाऱ्या व्यक्तीचा कसून शोध सुरू होता. अशातच मुंबई एटीएसला एक सुगावा लागला. त्यानंतर तपासाची सूत्र अधिक वेगानं फिरवत मुंबई एटीएसनं आरोपीला मुंबईतील मालाड परिसरातून ताब्यात घेतलं. सध्या या प्रकरणाची कसून चौकशी सुरू आहे. 

News Reels

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Mumbai-Pune Air Quality Index : मुंबई-पुण्यातील हवेची गुणवत्ता बिघडली, पुढील दोन दिवस हवा प्रदूषित राहणार

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMimAFodHRwczovL21hcmF0aGkuYWJwbGl2ZS5jb20vbmV3cy9tdW1iYWkvYnJlYWtpbmctbmV3cy1ib21iLWJsYXN0LWxpa2UtMTk5My13aWxsLWhhcHBlbi1pbi1tdW1iYWktYWdhaW4tdGhyZWF0LWNhbGwtaW4tbXVtYmFpLXBvbGljZS1jb250cm9sLXJvb20tMTEzODk5NNIBAA?oc=5