मुंबई बातम्या

Crime News : मुंबई सीमा शुल्क विभागाच्या कारवाईत 46 कोटींचे ड्रग्ज जप्त – Sakal

मुंबई
sakal_logo

By

मुंबई : मुंबई सीमा शुल्क केलेल्या कारवाईत मुंबई विमानतळावरून 4.47 किलो हेरॉईन आणि 1.596 किलो कोकेन ड्रग्ज जप्त केले आहे. जप्त केलेल्या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 46 कोटी रुपये आहे.

या प्रकरणी एका परिवाराच्या 3 सदस्यांना अटक करण्यात आली आहे.मुंबईहून दुबईला कुटुंब अमली पदार्थ घेऊन जात असतात पकडले गेले कुटुंबात दोन वृद्ध आणि एक तरुण प्रवास करत होते.

सीमाशुल्क विभागाच्याने शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार , मुंबई विमानतळावर अमली पदार्थांसह काही प्रवासी आल्याची माहिती सीमा शुल्क विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुरुवारी रात्री कस्टम विभागाच्या पथकाने दोन वेगवेगळ्या प्रकरणात 47 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.

सीमाशुल्क विभागाकडून ड्रग्जविरोधात विशेष मोहीम सुरू असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. अटक प्रवासी दुबईच्या FZ 446 क्रमांकाच्या फ्लाइटने मुंबईहून दुबईला जाणार होते. त्यानंतर त्याला बोर्डिंग दरम्यान थांबवण्यात आले. जेव्हा त्यांची तपासणी केली असता अमली पदार्थ मिळाले.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMibWh0dHBzOi8vd3d3LmVzYWthbC5jb20vbXVtYmFpL2RydWdzLXdvcnRoLTQ2LWNyb3Jlcy1zZWl6ZWQtaW4tbXVtYmFpLWN1c3RvbXMtZGVwYXJ0bWVudC1vcGVyYXRpb24tY3JpbWUtcmpzMDDSAXFodHRwczovL3d3dy5lc2FrYWwuY29tL2FtcC9tdW1iYWkvZHJ1Z3Mtd29ydGgtNDYtY3JvcmVzLXNlaXplZC1pbi1tdW1iYWktY3VzdG9tcy1kZXBhcnRtZW50LW9wZXJhdGlvbi1jcmltZS1yanMwMA?oc=5