मुंबई बातम्या

मुंबईः नेव्ही नगर परिसरात संशयीत बोटीचा वावर; पोलीस, नौदलासह सर्व सुरक्षा यंत्रणा सतर्क – Loksatta

नववर्षाच्या पूर्वसंध्येला सागरी सुरक्षेच्या दृष्टीने सर्व यंत्रणा सतर्क झाल्या असताना नेव्ही नगर परिसरात संशयीत बोट फिरत असल्याची माहिती मिळताच पोलीस व नौदलासह सर्व यंत्रणा सतर्क झाल्या होत्या. गस्ती नौकांनी तात्काळ समुद्रात गस्त घातली, पण कोणतेही संशयीत बोट सापडली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा >>>मुंबई: ‘एअर पोर्ट फनेल’मधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी स्वतंत्र नियमावली?

नौदलाच्या डेप्युटी लेफ्टनंट दर्जाच्या अधिकाऱ्याकडून याबाबत माहिती मिळताच मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला दूरध्वनीवरून सूचित करण्यात आले. मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला नेव्ही नगर मेस व शिव मंदिर परिसरात संशयीत बोट फिरत असल्याची माहिती देण्यात आली. त्यानुसार नियंत्रण कक्षाने याबाबतची माहिती यलो गेट पोलिसांना दिली. यलोगेट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पाटणकर व त्यांच्या पथकाने ‘मुंबई १४’ गस्ती नौकेतून लाईट हाऊस परिसरात शोधमोहीम राबवली. पण धुके व खराब वातावरणामुळे त्यांना कोणतीही बोट दिसली नाही. त्याशिवाय मुंबई सागरी पोलिसांच्या ‘कोयना’ नौकेनेही टीआयएफआर परिसरात शोध मोहीम राबविली.

हेही वाचा >>>मुंबई: बांधकाम स्थळी वास्तव्यास असलेल्या २२७ मुलांना दिली गोवरची लस

नौदलाकडून याबाबतची माहिती घेतली असता संबंधित बोट निघून गेल्याचे समजले. धुक्यामुळे ही बोट कोणत्या दिशेने गेली हे समजू शकले नाही. त्यानंतर यलोगेट, सागरी १, सागरी २, नवी मुंबई, ठाणे, पालघर , मिरा-भाईंदर, रायगर, सागरी सुरक्षा या सर्वांना यासंदर्भात माहिती देण्यात आली. खबरदारीचा उपाय म्हणून नौदलाच्या मेस व शिव मंदिर परिसरात ‘कोयना’ नौका तैनात करण्यात आली आहे.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMibmh0dHBzOi8vd3d3Lmxva3NhdHRhLmNvbS9tdW1iYWkvc3VzcGljaW91cy1ib2F0LW1vdmVtZW50LWluLW5hdnktbmFnYXItYXJlYS1tdW1iYWktcHJpbnQtbmV3ZXMtYW15LTk1LTMzNjkzMDAv0gFzaHR0cHM6Ly93d3cubG9rc2F0dGEuY29tL211bWJhaS9zdXNwaWNpb3VzLWJvYXQtbW92ZW1lbnQtaW4tbmF2eS1uYWdhci1hcmVhLW11bWJhaS1wcmludC1uZXdlcy1hbXktOTUtMzM2OTMwMC9saXRlLw?oc=5