मुंबई बातम्या

Maharashtra Breaking News LIVE Today : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर – Zee २४ तास

28 Dec 2022, 22:50 वाजता

फायनान्सवाल्यांची मुजोरी कोण रोखणार?

Financier’s plight | Marathi News LIVE Today : संभाजीनगरच्या कॅनॉट प्लेसमध्ये दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी झाली. मोबाईलचा हप्ता थकला म्हणून फायनान्सवाल्यांकडून 3 लाभार्थ्यांना मारहाण करण्यात आली. फायनान्सवाल्यांनी एक हप्ता थकला त्यामुळे आईचा फोटो व्हायरल केला असल्याचा ग्राहकाचा आरोप. 8 फायनान्सवाल्यांकडून 3 लाभार्थ्यांना जबर मारहाण.

बातमी पाहा – https://bit.ly/3VqNcCt

28 Dec 2022, 19:55 वाजता

राजकारण चुकीच्या लोकांच्या हातात – राज ठाकरे

Raj Thackeray Live | Maharashtra Political News :  ‘सामाजिक कार्याला राजकीय धार असणं आवश्यक’, राजकारण नासवलं जातंय, राजकारण चुकीच्या लोकांच्या हातात, सद्यस्थितीतील राजकारणावर राज ठाकरे (Raj Thackeray) यांचं विधान.  ‘बेळगाव प्रश्न गेले कित्येक वर्ष ऐकतोय’, तरुणांनी राजकारणात यायला पाहिजे- राज ठाकरे.

‘बेळगाव प्रश्न गेले कित्येक वर्ष ऐकतोय’, महाराष्ट्र जातीपातींमध्ये बरबाद होतो- राज ठाकरे. ‘महाराष्ट्रात उद्योजक मोठे झाले’, दुसऱ्या राज्यातले इकडे येऊन मोठे होतात, अनेक डॉक्टर्स नाट्य, चित्रपटात यशस्वी, राजकारणात माणसं आणू शकता, लादू शकत नाही- राज ठाकरे.

28 Dec 2022, 19:14 वाजता

पुणं बरबाद व्हायला वेळ लागणार नाही- राज ठाकरे

Raj Thackeray Live | Maharashtra Political News : पुण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं जाहीर व्याख्यान. मुंबई बरबाद व्हायला काही काळ गेला, पुणं बरबाद व्हायला वेळ लागणार नाही- राज ठाकरे
 विचारवंत राजकारणापासून दूर गेले, तरुण राजकारणापासून दूर जातायत-राज. मुंबईत स्कायवॉक वाया गेले, स्कायवॉकसाठी हजारो कोटी वाया गेले-राज. पुण्यात मेट्रो प्रकल्पाची गरज आहे का? राज ठाकरेंचा पुणेकरांना सवाल.प्रत्येक शहराची मानसिकता वेगळी-राज ठाकरे

बातमी पाहा – https://bit.ly/3VCfWsg

28 Dec 2022, 17:46 वाजता

मुंबई मनपातील शिवसेना कार्यालयावर शिंदे गटाचा दावा

Shinde Group Aggressive | Maharashtra Political News :  मुंबई मनपातील शिवसेना कार्यालयावर शिंदे गटाचा दावा. शिंदे गटाचे (Shinde Group) पदाधिकारी मुंबई मनपात दाखल. शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पालिका आयुक्तांची घेतली भेट. मुंबई बाळासाहेबांच्या शिवसेनेची – राहुल शेवाळे (Rahul Shewale). मुंबई मनपातील शिवसेना कार्यालय ताब्यात घेण्यासाठी शिंदे गट आक्रमक.

बातमी पाहा – शिंदे गट BMC मध्ये घुसला; शिवसेना पक्ष कार्यालयावर जबरदस्ती कब्जा

28 Dec 2022, 17:07 वाजता

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची सुटका

Anil Deshmukh’s release | Maharashtra Political News : माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची सुटका. अनिल देशमुख आर्थर रोड जेलबाहेर. 14 महिन्यानंतर देशमुखांची सुटका. अनिल देशमुखांच्या स्वागताला राष्ट्रवादीचे बडे नेते, आर्थर रोड जेलबाहेर जयंत पाटील, सुप्रिया सुळे उपस्थित, अजित पवार, छगन भुजबळ, वळसे-पाटील दाखल. आर्थर रोड जेलबाहेर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची गर्दी. नागपुरात अनिल देशमुखांच्या घराबाहेर जल्लोष.
न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास-अनिल देशमुख, सुटकेनंतर अनिल देशमुखांनी मानले सर्वांचे आभार. माझ्याविरोधात आरोपांमध्ये तथ्य नाही-अनिल देशमुख.

बातमी पाहा – 14 महिन्यांचा वनवास संपला! अनिल देशमुख अखेर जेलबाहेर आले; सुप्रिया सुळेंसह राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी…

28 Dec 2022, 14:53 वाजता

इम्तियाज जलील यांचे सुभाष देसाई यांच्यावर गंभीर आरोप

Imtiyaz Jalil On Shubhash Desai : सुभाष देसाई यांनी 1 हजार कोटींचा लँड कन्व्हर्जन अर्थात भूखंड रुपांतरणाचा घोटाळा केला, असा आरोप MIM खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jalil) यांनी केलाय.  उद्योगांसाठी शेतक-यांची जमीन अधिग्रहीत करायची. ती जमीन सूट मिळवून उद्योजकाला द्यायची आणि मग उद्योग आजारी आहे म्हणून बंद करायचे. गेल्या 15 वर्षात 32 हजार हेक्टर जमीन इंडस्ट्रियल लँड म्हणून बदलण्यात आली. या घोटाळ्यात सुभाष देसाई (Shubhash Desai) आणि त्यांच्या मुलाचा हात असल्याचा आरोप जलील यांनी केलाय. 

बातमी पाहा – सुभाष देसाईंकडून 1हजार कोटींचा घोटाळा; इम्तियाझ जलील यांचे गंभीर आरोप

28 Dec 2022, 14:49 वाजता

प्रशासनाची एक चूक, अख्खं गाव विस्थापित

Maharashtra News : बातमी धाराशिवच्या (Dharashiv) परंडामधली.. प्रशासनाच्या एका चुकीनं गावच्या गाव विस्थापित झालंय… परंडा तालुक्यातलं (Taluka Paranda) खासापूर हे जेमतेम 300 उंब-याचं गाव. पण सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) हे गाव उठवण्याचे आदेश दिलेत. 4 जानेवारीपर्यंत गावक-यांना गाव सोडून जाण्याचे आदेश देण्यात आलेत. अचानक गाव सोडून कुठे जायचं असा प्रश्न इथल्या गावक-यांना पडलाय… सामाजिक कार्यकर्ते रमेश गणगे यांनी या गावकऱ्यांचे पुनर्वसन करण्याची मागणी केलीय. नाहीतर तहसीलदार कार्यालयासमोर गावक-यांसह तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलाय.. प्रशासनाने मात्र यावर हात झटकले असून गावाचा प्रश्न खासगी असल्याचा दावा केलाय. 

बातमी पाहा – प्रशासनाची एक चूक भोवली, कडाक्याच्या थंडीत एका गावातील 300 कुटुंब रस्त्यावर

28 Dec 2022, 14:44 वाजता

तुनिषा शर्मा-शीझानचं ब्रेकअप कशामुळे? व्हाट्स अ‍ॅप चॅटचा होणार तपास

Tunisha Sharma Suicide Update | Marathi News LIVE Today : तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) आत्महत्येप्रकरणी आताची सर्वात मोठी बातमी.. तुनिषा आणि शीझानचा (Sheezan Khan) ब्रेकअप व्हॉट्स अ‍ॅप चॅटमुळेच (What’s App Chat) झाल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यादृष्टीने तपास सुरु केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.. जूनमध्ये झालेलं या दोघांमधलं चॅट अडीचशे ते तीनशे पानांचं आहे.. एका मुलीसोबतचं चॅट शीझानने डिलीट केल्याचं समोर आल्याचंही सूत्रांचं म्हणणं आहे. ही शीझानची सीक्रेट गर्लफ्रेंड असल्याचाही दावा केला जातोय. तेव्हा या मुलीसोबतचं चॅट तुनिषाच्या आत्महत्येआधी की नंतर डिलीट केलं याचाही तपास केला जातोय. शीझानने या एकाच मुलीसोबतचं चॅट का डिलीट केलं याचा तपास करण्यासाटी पोलीस आज शीझानचा रिमांड वाढवून मागणार आहे. तसंच हे चॅट मिळवण्यासाठी व्हॉट्स अ‍ॅपसोबतही संपर्क साधला जाणार आहे.

बातमी पाहा – तुनिषा शर्मा-शीझानचं ब्रेकअप कशामुळे? व्हाट्स अ‍ॅप चॅटचा होणार तपास

28 Dec 2022, 14:21 वाजता

युवासेनेचा बडा पदाधिकारी अडकणार?

Maharashtra Winter Session 2022 : मुंबई महानगरपालिकेमध्ये कुपर-भगवती रुग्णालयात (Cooper Hospital) घोटाळा झाल्याचा आरोप भाजपने केलाय… मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनीही (Chief Minister Eknath Shinde) आता या घोटाळ्याची चौकशी करणार असल्याची घोषणा केलीय. कुपर-भगवतीच्या घोटाळ्यात ठाकरे परिवारातली जवळची व्यक्ती आणि युवा सेनेचा बडा पदाधिकारी (Yuvasena Leader) अडचणीत येण्याची शक्यता आहे. शिंदे गटातल्या मंत्र्यांची प्रकरणं ठाकरे गटानं (Thackeray Group) बाहेर काढली होती. त्यामुळे आता शिंदे गटाकडून कुपर घोटाळ्याची चौकशी करत पलटवार केल्याचं बोललं जातंय. दरम्यान या घोटाळ्याप्रकरणी भाजप आमदार विधानपरिषदेत आक्रमक झालेले पाहायला मिळाले होते.

बातमी पाहायुवासेनेचा बडा पदाधिकारी अडकणार?

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMi2QFodHRwczovL3plZW5ld3MuaW5kaWEuY29tL21hcmF0aGkvbGl2ZS11cGRhdGVzL21haGFyYXNodHJhLWxhdGVzdC1uZXdzLWxpdmUtMjgtZGVjZW1iZXItZWtuYXRoLXNoaW5kZS1kZXZlbmRyYS1mYWRuYXZpcy11ZGRoYXYtdGhhY2tlcmF5LXJhai10aGFja2VyYXktcG9saXRpY2FsLW5ld3MtbXVtYmFpLXB1bmUtbmFncHVyLW1hcmF0aGktbmV3cy1saXZlLXVwZGF0ZXMtNjc4NjI20gHdAWh0dHBzOi8vemVlbmV3cy5pbmRpYS5jb20vbWFyYXRoaS9saXZlLXVwZGF0ZXMvbWFoYXJhc2h0cmEtbGF0ZXN0LW5ld3MtbGl2ZS0yOC1kZWNlbWJlci1la25hdGgtc2hpbmRlLWRldmVuZHJhLWZhZG5hdmlzLXVkZGhhdi10aGFja2VyYXktcmFqLXRoYWNrZXJheS1wb2xpdGljYWwtbmV3cy1tdW1iYWktcHVuZS1uYWdwdXItbWFyYXRoaS1uZXdzLWxpdmUtdXBkYXRlcy02Nzg2MjYvYW1w?oc=5