मुंबई बातम्या

ये AU AU कौन है… मुंबई सोन्याची कोंबडीवरून अधिवेशनात बॅनरबाजी, सत्ताधाऱ्यांची मागणी काय? – TV9 Marathi

आज विधानसभवन परिसरात भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या आमदारांनी आदित्य ठाकरेंविरोधातला विषय आणखीच आक्रमकपणे मांडला. तर या प्रकरणी चौकशीची मागणी लावून धरली.

Image Credit source: tv9 marathi

नागपूरः विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाने महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) दोन नेत्यांविरोधात जोरदार आंदोलन केलं. आंदोलनात आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना अप्रत्यक्ष रितीने टार्गेट करण्यात आलं तर राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी मुंबईबद्दल केलेल्या वक्तव्यावरून सत्ताधाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली.

खासदार राहुल शेवाळे यांनी रिया चक्रवर्ती प्रकरणातील AU या फोन नंबरचा संबंध आदित्य ठाकरेंशी आहे का, याची चौकशी करण्याची मागणी केली. त्यावरून शिंदे गट आणि भाजप नेते आक्रमक झाले. शिंदे गटाचे मुख्य प्रतोद यांच्या हातात हे बॅनर होते.

टीव्ही 9 शी बातचित करताना भारत गोगावले म्हणाले, हे आमचं पोलखोल आंदोलन आहे. रिया चक्रवर्ती प्रकरणी जो कुणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई व्हावी, अशी आमची मागणी आहे… रिया चक्रवर्ती हिच्या फोनमधील AU नेमकं कोण आहे, याचं सत्य बाहेर आलं पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

तर छगन भुजबळ यांनी काल मुंबईवर केलेल्या वक्तव्याचा निषेध भाजप आमदारांनी केला. मुंबई ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे, असं वक्तव्य काल छगन भुजबळ यांनी केलंय. यावरून कालपासूनच भाजप नेत्यांनी तीव्र टीका केली.

[embedded content]

आज विधानसभवन परिसरात भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या आमदारांनी हा विषय आणखीच आक्रमकपणे मांडला. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया दिली.

ते म्हणाले, मुंबई ही महाराष्ट्र, हिंदुस्तानची जान आणि शान आहे. अशा मुंबईचा भुजबळांनी अपमान केलाय. सोन्याचं अंडं देणारी कोंबडी म्हणून त्यांनी हिणवलं आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. देशाचा स्वाभिमान आणि अभिमान आहे. त्या वक्तव्याचा निषेध म्हणून आम्ही आंदोलन करतोय…

विरोधकांच्या हातात श्रीखंडाचे डबे..

तर नागपूर NIT भूखंडाच्या आरोपांवरून अधिवेशनात आज विरोधकांनीही आंदोलन केलं. हातात श्रीखंडाचे डब्बे घेऊन भूखंड घोटाळ्याविरोधात मविआ नेत्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

त्यावर पडळकर म्हणाले, ‘ विरोधकांकडे कोणताही महत्त्वाचा मुद्दा नाही. महाराष्ट्राच्या अनेक प्रश्नांवर त्यांनी सभागृहात बोलणं अपेक्षित होतं. पण ते झालेलं नाही.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMiwgFodHRwczovL3d3dy50djltYXJhdGhpLmNvbS9wb2xpdGljcy9uYWdwdXItbWFoYXJhc2h0cmEtYXNzZW1ibHktd2ludGVyLXNlc3Npb24tcHJvdGVzdC1hZ2FpbnN0LWFkaXR5YS10aGFja2VyYXktYW5kLWNoYWdhbi1iaHVqYmFsLWJ5LXNoaXZzZW5hLWFuZC1ianAtbWxhcy1pbi12aWRoYW5iaGF2YW4tYXJlYS1hdTEyMi04NDQ0NjguaHRtbNIBxgFodHRwczovL3d3dy50djltYXJhdGhpLmNvbS9wb2xpdGljcy9uYWdwdXItbWFoYXJhc2h0cmEtYXNzZW1ibHktd2ludGVyLXNlc3Npb24tcHJvdGVzdC1hZ2FpbnN0LWFkaXR5YS10aGFja2VyYXktYW5kLWNoYWdhbi1iaHVqYmFsLWJ5LXNoaXZzZW5hLWFuZC1ianAtbWxhcy1pbi12aWRoYW5iaGF2YW4tYXJlYS1hdTEyMi04NDQ0NjguaHRtbC9hbXA?oc=5